पान:व्यायामशास्त्र.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ९ वा. । -- -- विकृतिनाशक (चिकित्सक) व्यायाम. शरिरांतील विकार मोडण्यास औषध हा एकमेवाद्वितीय' उपाय आहे, अशी पूर्वी बहुतेक लोकांची समजूत होती. परंतु औषध हा किमान पक्षाचा व एकंदरीत फार खर्चाचा ( द्रव्यहाान व शक्तिहानि या दोन्ही दृष्टींनीं ) उपाय आहे, असे आता वैद्यशास्त्रज्ञांचे मत होत चालले आहे. रोगाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य आपल्या प्रकृतीमध्ये ईश्वराने ठेवले आहे व त्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करून घेणे हाच आरोग्यप्राप्तीचा मुख्य मार्ग आहे असे आतां ठरले आहे. औषधापेक्षां पथ्यपाणी व स्वेदन, बस्ती इत्यादि बाह्योपचारांस होमिओपॅथीत व इतर नवीन चिकित्सापद्धतींत आणि ब-याच अंशीं अॅलोपथींत जे महत्त्व आले आहे ते याच गोष्टीचे दर्शक आहे. तथापि हेही तत्त्व अद्याप संशयित आहे असे मानले, तरी निदानी ही गोष्ट सर्वमान्य आहे की, औषधांनीं रोगचिकित्सा केली असतां, औषधांचे, कडकीच्या रूपाने, जे दुष्परिणाम राहण्याचा संभव असतो तो, औषधांवांचून इतर उपायांनी रोगचिकित्सा केली असतां, राहत नाहीत. या कारणास्तव रोगचिकित्सेसाठी औषधाहून अन्य बाह्यौपाय विशेष महत्त्वाचे मानले पाहिजेत. मलावष्टंभ, क्षुधामांद्य,........यकृताची क्रिया बरोबर न चालणे