पान:व्यायामशास्त्र.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८४ ] छाती-श्वास घेऊन छाती फुगविणे व श्वास सोडून ती खालीं-पूर्व स्थितीप्रत-नणे. (२) कमरेत वांकून छाती मागें, पुढे, डाव्या अंगास व उजव्या अंगास वांकविणे व अनेक त-हेने वाटोळी फिरविणे. धड–पुढे बांकविणे (ओणवे होतांना वाकवावे लागते तसें), मार्गे वांकविणे, ताठ करणे, दोन्ही बाजूंस कमरेत वांकविणे, व वाटोळे फिरविणे. | पाय-एक पाय टेकून दुसरा पाय पुढे, मागे, व दोन्ही अंगांनी वर करणे व वाटोळा फिरविणे. मांड्या एकमेकींस चिकटून धरणे. गुडघा वांकविणे व ताठ करणे. पाऊल-मागे, पुढे, व बाजूंना वांकविणे. पायाची बोटें वर व खालीं वांकविणे. ।