पान:व्यायामशास्त्र.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८३ ] शरिराच्या एका टोंकापासून दुस-या टोंकापर्यंत शरिराचे सांधे पाहात गेले, म्हणजे शरिरांतील यावच्छक्य हालचाली समजून येतील. म्हणून हातापासून आरंभ करून पायाकडे जातांना क्रमाने लागणाच्या सर्व अवयवांच्या हालचाली पुढे दिल्या आहेत. | बोटे-१ मूठ मिटणे व उघडणे, म्हणजे बोटे वळविणे व ताठ करणे. २ बेचका फांकतील अशा रीतीने बोटें हालविणे अथवा | फांकण. । ३ बोटांनी पदार्थ दाबणे व उचलणे. मनगट-मागे, पुढे, डाव्या व उजव्या बाजूस, व तसेच वाटोळे फिरविणे. अग्रहस्त-खालीं, वर करणे; व उजवीकडे किंवा डावीकडे कोपराचे सांध्यावर जागच्या जागी वाटोळा फिरविणे. दंड अथवा सबंध हात-पुढील बाजूने व तसेच पार्श्वभागाने उचलून ताठ आडवा पसरून धरणे; अगदी वर उचलून ताठ उभा धरणे; अनेक स्थितींत वाटोळा फिरविणे; पुढे ताठ पसरून तो आडव्या पातळींत ( पोहतांना हात मारतात त्याप्रमाणे ) फिरविणे. करवताने कापतांना किंवा गाडी ढकलतांना हात पुढे ढकलतो त्याप्रमाणे हात पुढे रेटणे. असंच खालच्या, वरच्या व पार्श्वभागाकडे हात रेटणे. चेंडू किंवा धोंडा फेकतांना हातास हिसका देतो तसा हिसका देणे. मान-मागें, पुढे, आणि दोन्ही बाजूला वांकविणे व वाटोळी फिरविणे,