पान:व्यायामशास्त्र.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ७९ ] व्यवसाय आहेत, ते करण्याविषयी त्यांना शक्य तेवढे उत्तेजन द्यावे. अर्थात् श्रीमंतीमुळे अथवा श्रीमंतीच्या खोट्या कल्पनेमुळे ज्या स्त्रिया घरांतील श्रमाची कामे करीत नाहीत त्यांना विशेषतः शहरांतील स्त्रियांना--ही गोष्ट लागू आहे. गरीब लोकांच्या बायकांना श्रम करण्यास उत्तेजन देण्याचे फारसे प्रयोजन नाही. कारण, त्यांना शारीरिक श्रम स्वाभाविकपणे पुष्कळ घडतात. फुगड्या, धिंगा, लपालपी, शिवाशीव वगैरे मुलींचे खेळ मनास आनंद देऊन व्यायाम घडविणारे आहेत. तसेच पाणी ओढणे, धुणे, कांडणे, केर काढणे वगैरे कामें पोट, हात, वगैरेतील स्नायूस मजबूत करणारी आहेत. म्हणून वरील खेळ खेळण्यास मुलींना व कामें करण्यास प्रौढ स्त्रियांना उत्तेजन द्यावे. सभ्यपणाच्या किंवा श्रीमंतीच्या चुकीच्या कल्पनेने वरील खेळ व कामें बंद करणे अगदी वेडेपणा आहे. अगदी अल्पवयांतही बहुतेक स्त्रियांचे अवयवास शैथिल्य येते. यावरून स्त्रियांस व्यायामाची आवश्यकता किती आहे हे दिसून येईल. हल्ली लहानपणी शारीरिक श्रमाचे खेळ खेळण्याची सवड मुलींना कमी मिळत असल्यामुळे, व ( दारिद्य वाढले आहे तरी ) शारीरिक श्रमाची कामें मोलाने करून घेण्याची पद्धति दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, स्त्रियांना व्हावा तितका व्यायाम होत नाहीं; म्हणून त्यांचे व्यायामासंबंधाने विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यांना शारीरिक श्रम करावे लागत नाहीत अशा पुरुषांप्रमाणे स्त्रियांचीही पोटें स्थूल च अशक्त झालेली असतात. म्हणून पोटाचे