पान:व्यायामशास्त्र.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युतोऽपि वा । वैकुंठं समवाप्नोति विष्णुना सह मोदते ' * गंगागंगेति यो ब्रूयाद्योजनानां शतैरपि। मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं च गच्छति' यासारखी अर्थवादाची किंवा अतिशयोक्तीची वचने सोडून देऊन, * शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं ' ही कालिदासोक्ति, ' आयुर्धर्मार्थसाधनं' ही वाग्भटोक्ति किंवा * प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्मिषः। अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ' ही भगवद्गीतोक्ति, ह्या लक्षात घेतल्या, तर असे दिसून येईल की, परमार्थसाधनास शारीरिक संपत्तीची अत्यंत आवश्यकता आहे. गीतावचनाप्रमाणे, चित्तशुद्धीस सत्कर्मे करावी लागतात, व सत्कर्मे करण्याकरितां श्रम करावे लागतात; एवढेच नव्हे, तर सत्कर्मे करण्यास दुष्ट लोकांकडून जो प्रतिबंध होतो, तो नाहींसा करण्यास संग्रामही करावा लागतो; आणि श्रम,व संग्राम, शारीरिक संपत्तीवाचून होणे अशक्य आहे हे उघड आहे. म्हणून मोक्षसाधनास अवश्य असणारी जी चित्तशुद्ध, तिचे साधन जी सत्कमें, ती करण्यास शारीरिक संपत्तीची आवश्यकता आहे. शिवाय हे लक्षात घेतले पाहिजे की, सत्कृतीस ज्ञानाचीही आवश्यकता आहे. ज्या ज्ञानाने मनुष्य सच्छील बनतो, ते ज्ञान जगाचा प्रत्यक्ष अनुभव व ग्रंथाध्ययन या साधनांनी मिळवावयाचे असते; व ही गोष्ट मानसिक श्रमावांचून होणे अशक्य आहे. आतां मानसिक श्रम करण्यासही शारीरिक संपत्तीची जर अनुकूलता लागते, तर ज्ञानप्राप्तीस शारीरिक संपत्तीची आवश्यकता आहे, असे स्पष्ट दिसते. यावरून सत्कर्मे करण्यास शारीरिक संपत्तीची आवश्यकता आहे, असे एकंदरीत दिसून येईल. शरीरसंपत्तिहीन मनुष्याच्या हातून यात्रा होणार नाहीं, तपश्चरण होणार नाही, वेदशास्त्रांचे पारायण होणार नाहीं, परोपकाराची म्हणजे लोकवची कामे होणार नाहीत किंवा बलि, रावण इत्यादि