पान:व्यायामशास्त्र.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७५ ] ( १ ) बुद्धिमांद्य येते. | ( २ ) स्नायूंस दार्श्व येते. (३) रक्ताशय फाजील मोठे होऊन त्यांतील निबर तंतूची संख्या वाढते; त्यामुळे त्याचा लवचिकपणा व शक्ति ही कमी होतात व रक्ताशय विकृत होऊन अल्पकाळी मृत्यु येतो. | ( ४ ) लहानपणी अतिरिक्त श्रम केल्यास शरिराची पुरती वाढ होत नाही व ते निस्तेज राहते. कमी जास्त दम लागणे हे श्रमाच्या कमीजास्त अवघडपणाचे किंवा परियाणाचे प्रमाण अथवा माप आहे.-स्नायूस श्रम जों जो अधिक, तों तों त्यामध्ये अधिक झीज होते. तसेच स्नायु जो जो अधिक मोठा, तो तो त्याच्या श्रमाने झीज अधिक होते, आणि झीज जो जो अधिक, तों तों कार्बनिक असिड वायूची उत्पत्ति अधिक होते. आतां रक्तांत काबनिक असिड वायु जो जो अधिक होतो, तो तो त्यास घालवून देण्याकरितां फुफ्फुसांचा श्वासोच्छ्वास जोराने चालतो. म्हणून शाररांत कार्बनिक असिड वायूची उत्पत्ति जसजशी अधिक होते, तसतसा दम अधिक लागतो. यावरून दम कमीजास्त लागणे हे श्रमाच्या कमीजास्त प्रमाणावर अवलंबून आहे असे दिसून येईल. याकरितां कोणत्याही व्यायामाचा कमीजास्त अवघडपणा अथवा श्रमाचे परिमाण ठरविण्यास या प्रमाणाचा उपयोग करीत जावें. अंगांतून पुष्कळ घाम येईपर्यंतच व्यायाम करीत राहिले पाहिजे हा समजूत चुकीची आहे.-घाम कमीजास्त येणे हे प्रकृ