पान:व्यायामशास्त्र.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ७४ ] अतिरिक्त व्यायाम. कोणतीही गोष्ट मर्यादेबाहेर गेली तर ती अपायकारक होते. अन्न वाजवीपेक्षा जास्त खाल्ले तर ते रोगोत्पत्तीस कारण होते. तसेच व्यायामासंबंधाने आहे. व्यायाम वाजवीपेक्षा जास्त घेतला तर त्यापासून अपाय होतो. म्हणून व्यायाम वाजवीपेक्षा जास्त होत आहे किंवा काय हे जाणणे अवश्य आहे. ह्यासंबंधाने पुढील नियम लक्षात ठेवावे. (१) व्यायामाने चेहरा निस्तेज व सुकट होईल तर तो व्यायाम वाजवीपेक्षा जास्त होत आहे असे समजावे. (२) व्यायाम करीत असतां, किंवा व्यायामानंतर, हृदयांत दुखू लागेल किंवा हृदयाचे धडधडणे सुरू होऊन जीव अस्वस्थ होईल, तर आपले हृदय म्हणजे रक्ताशय अशक्त आहे व व्यायाम शक्तीबाहेर होत आहे असे समजून तो कमी करावा. (३) व्यायाम करतांना नाडीचे ठोके दर सेकंदास १२०पेक्षा जास्त पडू लागले किंवा नाडीचे टाक मधून मधून बंद पडू लागल, म्हणजेही व्यायाम शक्तीबाहेर होत आहे असे समजून तो कांहीं वेळ कमी करावा किंवा बंद करावा. । अतिरिक्त शारीरिक श्रम बरेच दिवस करण्यापासून शरीर सर्व प्रकारचे विकारांस पात्र होते. त्यांतूनही पुढील विकार हो ण्याची भीति विशेष असतेः—दोषिक ज्वर, अपस्मार.........इ०. वाजवीपेक्षा जास्त व्यायाम करण्यापासून होणारे दुष्परिणाम पुढे दिल्याप्रमाणे आहेत.