पान:व्यायामशास्त्र.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६९ ] चालणे, पळणे, वगैरे पायांच्या श्रमांनी फुफ्फुसांचा चांगला विकास होतो. स्नायु जसजसा मोठा, तसतशी त्याच्या संकोचप्रसरणाने होणारी झीज जास्त; म्हणून स्नायु जसजसा मोठा तसतसे त्याच्या व्यायामामुळे फुफ्फुसांस पडणारे कामही जास्त. या कारणानें, एकाद्या व्यायामापासून फुफ्फुसांना कमीजास्त श्रम होणे हैं, तो व्यायाम ज्या स्नायूंना घडतो, त्यांच्या लहानमोठेपणावर | अवलंबून आहे. पायाचे स्नायु सव स्नायूंत मोठे आहेत ( पायांतील सर्व स्नायूंचे वजन हातांतील स्नायूंच्या तिप्पट आहे ), यामुळे पायांचा उपयोग केल्याने फुफ्फुसांस जितका व्यायाम मिळतो तितका, ज्यांचा फुफ्फुसांशी प्रत्यक्ष संबंध नाहीं अशा दुसन्या कोणत्याही स्नायूंच्या व्यायामापासून मिळत नाहीं, पळण्याने श्वासोच्छ्वास जितका जोराचा चालतो, तितका दुस-या कोणत्याही व्यायामापासून चालत नाही, यावरून वरील गोष्ट स्पष्ट दिसून येते. म्हणून फुफ्फुसांचा विकास करण्यास व त्यांना मजबूत करण्यास धावणे, चढण चढणे वगैरे पायाचे व्यायाम उपयोगी आहेत. कुस्तीने पुष्कळ दम लागतो म्हणून कुस्तीनेही फुफ्फुसांचा चांगला विकास होतो, पाठीचे स्नायु,आणि उरोज व अधिस्कंध हे स्नायु बरेच मोठे आहेत, म्हणून या स्नायूंना श्रम झाल्यानेही फुफ्फुसांस बळकटी येते. • स्नायु दगडाप्रमाणे टणक होणे हे त्यांच्या विकासाच्या परमावधीचे लक्षण आहे ही समजूत चुकीची आहे- ज्या संतचे स्नायु बनले आहेत ते तंतु मऊ असून संकोच्यता