पान:व्यायामशास्त्र.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वरून दिसून येणारी प्राचीन आर्याची दीर्घ आयुर्मर्यादा, आफ्रिका, नाव्हा इत्यादि दूरदूरच्या प्रदेशांशी व्यापार करण्याची व त्यांत वसाहती करण्याची प्राचीन हिंदूची प्रवृत्ति, व त्यांचे एकंदर शारीरिक पराक्रम यांची, अर्वाचीन हिंदु लोकांची आयुमर्यादा, त्यांची प्रवासपराङ्मुखता, व त्यांचे शारीरिक पराक्रम यांशी तुलना केली । असतां ही गोष्ट सहज दिसून येणारी आहे. शारीरिक संपत्तीच्या बाबतीत हे अंतर पडण्याची इतर कारणे काय असतील ती असोतः पण परमार्थसाधनासाठी ( सत्य अथवा भ्रांतिमूलक परमार्थासाठी ) ऐहिक ऐश्वर्याची व अर्थात् शारीरिक संपत्तीची उपेक्षा, हे कारण त्यांमध्ये प्रमुख असावे असे वाटते. ऐहिक ऐश्वर्य, ऐहिक उपभोग व त्यांचे साधन जी शारीरिक संपत्ति यांपासून होणारे सुख शाश्वतिक नाहीं, व ह्या गेष्टी सोडून हरिनामसंकीर्तन, ईशचिंतन, ईशध्यान ह्या गोष्टी करण्यापासून अत्युच्च सुखाची प्राप्ति होते अशी जर सर्वसामान्य समजूत, तर शारीरिक पराक्रम व शारीरिक संपत्ति यांची उपेक्षा होणे स्वाभाविक नाहीं काय ? आतां ऐहिकैश्वर्यसंपादन व परमार्थसाधन यांमध्ये स्वाभाविक विरोध आहे की काय, हा प्रश्न उत्पन्न होतो; व या प्रश्नाचा निर्णय करण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे जरी आम्ही कुबल करते, तरी आम्हांस असे म्हटल्यावांचून राहवत नाहीं की, आमच्या अल्पवद्धीप्रमाणे, या दोहोंत विरोध आहे, असे आम्हांस वाटत नाहीं. निदानीं, परमार्थसाधन व शारीरिक संपत्ति यांमध्ये जो विरोध कित्येकांस दिसतो, तो भ्रांतिमूलक आहे, व कांहीं परमार्थसाधनतत्पर लोक शारीरिक संपत्तीची जी उपेक्षा करतात, ती स्वहे. ताविघातक आहे, असे आम्हांस निश्चितपणे वाटते. धर्मग्रंथांतील गीतेत्यच्चारसयुक्तो म्रियमाणो गतिं लभेत। गीतार्थश्रवणासक्तो महापाप