पान:व्यायामशास्त्र.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६९ ] मर्दन.-शक्य असेल तेव्हां व्यायामानंतर आंग स्वतः चोळावें किंवा दुस-याकडून चोळून घ्यावे. आंग चोळण्याने किंवा चेपण्याने व्यायामाचा थकवा जातो एवढेच नव्हे तर त्यापासून मांसवृद्धीस मदत होते. स्नायु दाबल्याने त्यांतील निर्जीव द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते व स्नायूंवरील दाब काढून घेतल्यावर त्यांमध्ये जो रक्ताचा प्रबाह जोराने जातो, त्यामुळे त्यांचे पोषणास मदत होते. या कारणाने स्नायु चेपण्यापासून शरिरास फायदा होतो. आंग दुखत असेल तर ते चेपण्यापासून दुखावयाचें राहते व मनास हुशारी वाटते असा आपला अनुभव आहेच. | आंग चेपणे किंवा मर्दन करणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे; म्हणून ज्यांना काही कारणाने व्यायाम घेतां येत नसेल त्यांनी या व्यायामाचा उपयोग करावा. या व्यायामांत अशी एक सोय आहे की, याने श्रम न होतां व्यायाम केल्याचा बहुतेक फायदा मिळतो. नेहमीच्या व्यायामाने फायदा होतो याचे कारण व्यायाम करण्याने शरिरांतील घाण बाहेर टाकली जाऊन स्नायूंस रक्ताचा पुरवठा जोराने होतो व त्यायोगाने त्यांचे चांगले पोषण होते हे आहे; व कांहीं अंशी हाच परिणाम चेपण्यापासून होतो असे दिसून येते. कारण, चेपण्याने स्नायु दाबले जाऊन त्यांतील निर्जीव व अपायकारक द्रव्य बाहेर ढकलले जाते व त्यांस रक्ताचा जास्त पुरवठा होतो. म्हणून चेपून घेणे शरिरास हितावह आहे. मात्र या गोष्टीची कायमची व दुस्त्याज्य संवय लागतां उपयोगी नाही. शिवाय स्वतः व्यायाम न करतां मर्द