पान:व्यायामशास्त्र.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६४ ] असला तरी बेलाशक थंड पाण्याने स्नान करावे. मात्र व्यायाम करीत असतां लागलेला दम बंद होईपर्यंत स्नान करू नये. ३ ज्यांना कांहीं कारणाने शीतस्नान करवत नसेल त्यांनी थंड पाण्यांत भिजवलेले रुमाल घेऊन आंग पुसून काढावे. मात्र हे काम झटपट केले पाहिजे. ओल्या रुमालाने आंग पुसल्यावर ते लागलीच कोरड्या रुमालाने पुसावे. शरिराचा निमा भाग ओला व निमा भाग कोरडा, अथवा निमा भाग गारठलेला व निमा ऊबदार असा फार वेळ ठेवल्याने अपाय होण्याचा संभव असतो; म्हणून सर्व आंग ओल्या रुमालाने झटदिशी चोळणे व ते झटदिशीं कोरडे करणे अवश्य आहे. .. ४ वारंवार शैत्यबाधा न होण्यास शीतस्नान, हा एक उत्कृष्ट उपाय आहे. २ व्यायामानंतरचे शीतस्नान म्हणजे थंड पाण्यांत डुंबत बसणे नव्हे. हे शीतस्नान म्हणजे स्नानाचे हौदांत उडी टाकून लागलीच बाहेर येणे हे होय, उन्हाळ्याचे दिवसांत पाहिजे तर १० ते १५ सेकंद ( मिनिटें नव्हेत ) पाण्यांत रहावे. ( ही गोष्ट इंग्लंडसंबंधानें आहे. तथापि याचा अर्थ एवढा स्पष्ट आहे कीं, फार वेळ पाण्यांत राहणे चांगले नाही.) । ५ ज्यांचे रक्ताशय अशक्त असेल त्यांनी शीतस्नान करू नये. व्यायाम झाल्यावर ४।५ मिनिटांत हृदयाचे धडधडणे बंद झालें पाहिजे. तेवढ्या वेळांत ते बंद न होईल तर रक्ताशय दुर्बल किंवा विकृत आहे असे समजले पाहिजे..अशी स्थिति ज्यांची असेल त्यांनी व्यायामानंतर शीतस्नान करू नये.