पान:व्यायामशास्त्र.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६३ ] स्नानास घ्यावे. व रोज पाण्यांत जास्त जास्त विसण घालून पाण्याची उष्णता कमी करीत आणावी. याप्रमाणे उष्णता कमी करता करतां शेवटीं थंड पाण्याने स्नान करावे. स्नान करतांना अंगावर वारा लागू देऊ नये. स्नान केल्यावर अंगावर वारा एकसारखा वाहत राहील तर शारिरास एकदम गारवा येऊन थंडी होईल. म्हणून उघड्या जागेत स्नान करणे असेल व तेथे जोराचा वारा वाहत असेल तर स्नान केल्यावर लागलीच अंगावर पांघरुण घ्यावे. थंड पाण्याने स्नान केल्यावर नमस्कार घालणे, उन्हांत धोतरे धुणे, किंवा थोडेसे उन्हांत फिरणे वगैरे शरिरांत ऊब आणणारा किंवा अंगास घाम आणविणारा व्यायाम घडेल तर थंड पाण्याने थंडी होण्याची भीति राहणार नाहीं. ज्यांना ऊन पाण्याने स्नान करणे अपरिहार्य असेल, त्यांनी ऊन पाण्याने स्नान केल्यावर शेवटी अंगावर थंड पाण्याचे २॥३ तांबे घ्यावे* व अंग कोरडे करावे. आणि अंगांत चांगली ऊब येईतोपर्यंत अंग रुमालाने जोराने चोळावे. या योगाने शरिरास दाय येऊन हुषारी वाटते. स्नानाविषयीं सँडोचे मत. १ व्यायाम केला की, शीतस्नान केलेच पाहिजे; मग तो व्यायाम तुम्ही केव्हांही घ्या. व्यायामापासून पूर्ण फायदा व्हावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी या गोष्टीची उपेक्षा बिलकुल करता कामा नये. व्यायाम केल्यानंतर अंगास कितीही घाम आलेला | ही गोष्ट लोकांच्या समजुतीच्या विरुद्ध आहे, पण तीस कांहीं वैद्यशास्त्रज्ञांची संमात आहे. तथापि असे करावे असा आग्रह नाहीं.