पान:व्यायामशास्त्र.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६२ ] भाग ईश्वराने ताठ व मजबूत केला आहे. कण्याची रचना पाहिली तर असे दिसून येते की, तो विशेष मर्यादेचे पुढे वाकू नये अशीच योजना त्याच्या रचनेमध्ये केली आहे. असे असतां तो वांकविण्याचा प्रयत्न करणे हे ईश्वरी योजनेचे विरुद्ध आहे. म्हणून अंगाची घडी करण्याच्या ज्या कसरती असतात, त्या करूं नयेत. त्या करण्यापासून सामर्थ्य बिलकूल न वाढतां ज्या भागांत ताठपणा असणे विशेष महत्त्वाचे आहे त्या भागास दुर्बलता येते. तथापि पाठींतील कांहीं स्नायूंस व्यायाम मिळण्याकारिता पाठ मागील बाजूस थोडीशी वांकविणे अवश्य आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. मात्र ती वाजवीपेक्षा जास्त वांकविणे चांगलें नाहीं. व्यायामानंतर स्नान करणे हितावह आहे.—व्यायामाने घाम सुटून आंग अस्वच्ट होते व थोडा थकवाही येतो. अस्वच्छता आणि थकवा नाहींसा करण्यास स्नान हा उत्तम उपाय आहे. स्नान केल्याने शरीर स्वच्छ होते व त्वचेतील घामाच्या रंध्रांची तोंडे मोकळी होतात आणि हुषारी वाटते. स्नान थंड पाण्याने करावे. पोहण्याची सोय असल्यास पोहणे उत्तम. मात्र पोहण्याच्या मर्यादेचे अतिक्रमण करता कामा नये. थंड पाण्याने स्नान करण्याची संवय पूर्वी नसल्यास ती हळू हळू करावी. या संवयीस प्रारंभ उन्हाळ्यांत करावा म्हणजे थंड पाणी बाधण्याची भीति राहणार नाही. इतर ऋतूत थंड पाण्याचे स्नानास आरंभ करणे असेल तर प्रथम कोमट पाणी