पान:व्यायामशास्त्र.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६१ ] कसरतीचे कांहीं अनिष्ट प्रकार.–शरिराच्या ज्या भागास स्वाभाविक लवचिकपणा नाही, तसेच ज्या भागांत लवचिकपणाची जरूरी नाहीं त्या भागास लवचिकपणा आणणा-या कसरती प्रकृतीस हितकारक नसून अपायकारक असतात. शरिराची कमान करणे, अंगाची घडी करणे, वगैरे कामें कांहीं पैलवान व कसरत करणारे लोक करतात म्हणून ही कामे करणे शारीरिक सामर्थ्याचे लक्षण आहे, अशी कांहीं लोकांची जी समजूत झाली आहे ती चुकीची आहे. पाठ विशेष वांकविण्यापासून कसलाही फायदा नाहीं व तिची घडी करण्याचे प्रसंग व्यवहारांत कधीही येत नाहींत. धड हा एका अर्थाने शरीराचा पाया असल्यामुळे तों [ मागील पृष्ठावरून पुढे चालू. ] व्यायामजागराध्वस्त्रीहास्यभाष्यादि साहसम् ।। गजं सिंह इवाकर्षन् भजन्नति विनश्यति ।।। व्यायामापासून अंग हलके होते, काम करण्याचे सामर्थ्य येते. भूक वाढते, वात झडतो, व शरीर पीळदार आणि घट्ट होते. स्निग्ध आहार करणा-या व बळकट पुरुषांना शीतकाळी व वसंत-- ऋतूमध्ये आपल्या शक्तीच्या निम्मे व्यायाम करावा. इतर ऋतूंमध्ये अगद अल्प व्यायाम करावा. अतिव्यायामापासून तृषा, क्षय, श्वास, रक्तपित्त, श्रम ग्लानी, खोकला, ताप व वांति हे विकार उत्पन्न होतात. व्यायाम, जागरण, मार्गक्रमण, स्त्रीसेवन, हास्य व भाषण करणे इ० साहसांचे अतिसेवन करणारा मनुष्य हत्तीवर हल्ला करणा-या सिंहाप्रमाणे नाश पावतो. वाग्भट. अध्याय २ श्लोक ९-१३.