पान:व्यायामशास्त्र.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६० ] येतो. म्हणून मानसिक श्रम फार झाले तर शारीरिक श्रम कमी केले पाहिजेत, व शारीरिक श्रम फार झाले तर मानसिक श्रम कमी केले पाहिजेत. वरीलपैकी एका प्रकारचे श्रम विशेष झाल्यास दुस-या प्रकारचे श्रम होत नाहींत हा अनुभव सर्वांस आहेच. ही. जी श्रमाची स्वाभाविक मर्यादा आहे, तिचे अतिक्रमण केल्यास शरिरांतील शक्तीचा सांठा कमी होऊन प्रकृतींत क्षीणता येते. याकरिता शक्तीच्या मर्यादेबाहेर जाईल असा व्यायामं घेऊ नये. अन्नपचन बरोबर झाले नाही एवढ्याच प्रकारचे अजीर्ण झाले असेल तर सौम्य व्यायाम करण्यास हरकत नाहीं; परंतु जोराचे अजीर्ण झाले असतां व्यामाम करू नये. तसेच ज्वरं अमांश, अतिसार इत्यादि कोणत्याही तीव्र विकारांतही पूर्ण विश्रांत घेणे जरूर आहे. यासंबंधाने वाग्भटाचे वचन पुढीलप्रमाणे आहेः । वातपित्तामयी बालो वृद्धोऽजीर्णा च तं त्यजेत् ।* . ज्याला अजाणे किंवा वातपित्तात्मक विकार झाले आहेत त्याने, म्हाता-यांनी व मुलांनी ( सोळा वर्षांच्या आंतील ) व्यायाम करू नये.

  • , व्यायामासंबंधानं वाग्भटांत पुढीलप्रमाणे माहिती आहेः

लाघवं कर्मसामर्थ्य दीप्तोऽभिर्मेदसः क्षयः ।। विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते ।। अर्धशक्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः ।। शीतकाले वसंतेच मंदमेव ततेोन्यदा।। तं कृत्वानुसुखं देहं मर्दयेच्च समंततः ।। तृष्णा क्षयः प्रतमको रक्तपित्तं श्रमः क्लमः ।। अतिव्यायामतः कासो ज्वरश्छर्दिश्च जायते ।। .....