पान:व्यायामशास्त्र.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५६ ] आपल्या शरिरासंबंधाने प्रेम व अभिमान उत्पन्न होऊन त्याला व्यायामाची गोडी लागेल. कपडे.—तालीम करतांना अंग जितकें उघडे राहील तितकें चांगलें. म्हणजे तालीम करतांना लंगोटाशिवाय दुसरा कोणताही कपडा अंगावर असू देऊ नये. अंगांत कपडा असल्याने शरिराच्या हालचालीस व स्नायूच्या विकासास प्रतिबंध होतो. शिवाय शरीर उघडे राहिल्याने शरिरास मोकळी हवा मिळण्याचा जो प्रसंग येतो तो अंगांत कपडे घातल्याने येत नाही. आपण ज्याप्रमाणे नाकाने स्वच्छ हवा आंत घेतों . व शरिरांतील घाण वायु बाहेर सोडतों, त्याप्रमाणे त्वचाही आंत हवा घेण्याचे व शरिरांतील घाण बाहेर टाकण्याचे काम करीत असते. हा जो त्वचेचा श्वासोच्छास तो नीट चालण्यास त्वचा जितकी मोकळी राहील तितके चांगले असते. तालीम करतांना नाकाचा श्वासोच्छ्रास जसा भराभर चालतो, त्याप्रमाणे त्वचेचा श्वासही जोराने चालतो. या कारणास्तव तालीम करतांना आंग उघडे ठेवावे हे चांगले. तथापि व्यायाम करण्याच्या जागी अंगावर गार वारा येत असेल तर अंगांत सैल सद्रा राहू द्यावा. व्यायामास वेळ.--व्यायामास वेळ सकाळ किंवा संध्याकाळ चांगली. व्यायामानंतर थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे, म्हणून विश्रांति घेण्यास सकाळी अवधि मिळत नसेल तर व्यायाम संध्याकाळी घेणे बरें. एरव्हीं सकाळची वेळ फार चांगली. ज्या वेळी हवेत गारवा असतो त्यावेळी व्यायाम करणे चांगले. कारण अशा वेळीं थकवा