पान:व्यायामशास्त्र.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ५९ ] जास्त फायदा होतो, त्याप्रमाणेच व्यायामाची स्थित आहे. म्हणून पंधरा मिनिटांत भराभरा व्यायाम घेण्यापेक्षां तेवढाच व्यायाम सावकाश व दिवसांतून दोनदा घेणे अधिक फायदेशीर आहे. । व्यायाम करतांना फार मोठ्या वजनाच्या जोड्या किंवा डम्बेल्स घेणे हेही चुकीचे आहे. मोठ्या जोडीने अथवा डम्बेल्सनी लवकर थकवा येतो, यामुळे त्यांचे हात कमी होतात. या कारणाने अशा व्यायामापासून व्हावा तितका फायदा होत नाहीं. | व्यायामांतील हालचाली सावकाश केल्याने शक्ति वाढेल, परंतु चापल्य येणार नाहीं; आणि सामान्य मनुष्यास तर शक्तीइतकीच, किंबहुना शक्तीहूनही अधिक, चापल्याची आवश्यकता असते. याकरितां कांहीं व्यायाम जलदीने अथवा वेगानें करावे. तालमीबरोबरच कुस्ती केली किंवा दांडपट्टा अथवा दसरे चापल्य आणणारे खेळ खेळले म्हणजे हा दोष नाहींसा होणारा आहे. | व्यायामशालेत आरसा असावा.--शक्य असेल तर व्यायाम करावयाच्या जागीं, व्यायाम करण्याचे ठिकाणासमोर, आरसा लावावा व व्यायाम करतांना आपले प्रतिबिंब आरशांत पहावे. असे केल्यापासून दोन फायदे होतात. एक, आपल्या हालचाली आरशांत पाहिल्याने त्यांमध्ये कांहीं चूक-बेढबपणा, चुकीची दिशा वगैरे असल्यास ती समजून येते; व दुसरा, आरशांत आपले अवयव दृष्टीस पडल्याने त्यांचेवर एकाग्रता करणे सोपे जाते. ज्यास व्यायामाची गोडी नाही अशा मनुष्याने रोज आरशांत शरीर पाहून त्यांमध्ये होणारा फरक पाहिला, म्हणजे त्यास