पान:व्यायामशास्त्र.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४७ ] व्यायाः ६ वा । जोडी करावी. या व्यायामाने मनगट व हातांचे इतर स्नायु यांस व्यायाम घडेल. वर सांगितलेले व्यायामाचे सर्व प्रकार सावकाशपणे केल्यावर त्यांपैकी कांहीं भराभर करावे. म्हणजे आंगांत चपलता राहील. दिवसांतून केव्हांतरी मोकळ्या हवेत थोडेसे पळावे. * पळण्याने आंगांत चपलता चांगली राहते व दम वाढतो.. | आठवड्यांतून एकदा तरी उन्हाचे वेळी डोंगर चढण्यास जावे. उन्हामध्ये डोंगर चढण्याची संवय केल्याने ऊन्ह व श्रम सहन करण्याचा कंटकपणा आंगीं येईल... बारवरील कांहीं काम मधून मधून करावी. सिंगलबारवरील कामाने खांद्याचे व पोटाचे स्नायूस उत्तम प्रकारची बळकटी येते. शक्य असेल तेव्हां मलखांबही करावा. व्यायामानंतर स्नान करावे. स्नान करतांना आंग चांगले चोळा, व स्नानानंतर रुमालाने आंग जोराने पुसून आंगांत ऊब आणावी.

  • निदान एक फलंगपर्यंत खूप जोराने पळतां येईल व एक मैलपर्यंत साधारण जोराने पळतां यईल इतका देम प्रत्येक मनुष्याने आपल्या अंगांत आणवावा. || व्यायामानंतर स्नान करण्याची चाल आपल्याकडे नाहीं. जेथे अंगावर वारा येतो अशा उघड्याजागेत, व्यायामानंतर स्नान केल्याने, किंवा स्नानानंतर ति चांगले कोरडे न केल्याने अथवा स्नानानंतर उघड्या अंगाने हवेत फिरल्याने, थंडी होण्याची भीति असते; म्हणून वरील चाल पडली असावी असे ना व्यायायाने घाम येऊन आंग अस्वच्छ होतं म्हणून व्यायामानंतरच भान करणे चांगले. पण तसे करतांना वर सांगितलेले दोष होऊ न देण्या. बद्दल खबरदारी घेतली पाहिजे. तशी खबरदारी घेतां येत नसेल तर व्यायाम केल्यानंतर १।२ तासांनी स्नान करावे हे बरे.