विकतोय!" त्याचा खरंच यावर विश्वास होता. प्रत्येकाला तो काहीतरी महान काम करतो आहे असे वाटले पाहिजे.
डॉ. कुरियन यांना विचारण्यात आलं होतं - “इतर सहकारी डेअरी अपयशी झाल्या असताना अमूल डेअरी एवढी यशस्वी का झालीय? शेवटी, प्रत्येक डेअरी दुधाचाच तर व्यवहार करते." यावर डॉ. कुरियन म्हणाले, “नाही. अमूल म्हणजे दूध नाही, चीज, चॉकोलेट किंवा लोणी नव्हे. अमूल आर्थिक-सामाजिक प्रयोग आहे. आम्ही काहीतरी महान काम करीत आहोत - आणंद हा जिल्हा संपूर्णपणे नव्या स्वरूपात घडविला जात आहे. जीवित कार्यावरील गाढ विश्वासामुळे असे लोक यशस्वी ठरतात." प्रत्येकाला स्वत:भोवती एक प्रकाशवलय-तेजोवलय हवे असते आणि ते प्राप्त करण्याचा मार्ग असतो जीवितकार्याविषयीची जाणीव.
दुसरी बाब म्हणजे ‘कृतीची जाणीव' असणे. मला याच्या अगदी विरुद्धची, उलट असलेली बाब - ‘कृतिशून्यतेची जाणीव' म्हणजे काय हे स्पष्ट करावे लागेल. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या एका मित्राला भेटण्यासाठी एका सरकारी कार्यालयात गेलो तेव्हा त्याच्या टेबलावर ‘अर्जट', 'खूप अर्जंट', 'तातडीचे', ‘खूपच तातडीचे' असे लेबल लिहिलेल्या फाईली पाहिल्या. मी म्हणालो, “माफ कर! मी चुकीच्या वेळी आलोय. मी तुला कधीतरी दुस-या वेळी भेटेन." तो म्हणाला, “का बुवा? बसरे, एक कप चहा घे." मी म्हणालो, “पण तू तर खूप कामात आहेस!" “हे कुणी सांगितलं तुला?" त्याने विचारलं. मी म्हणालो, “ ‘अर्जट', 'खूप अर्जंट', ‘तातडीचे', ‘खूप तातडीचे' असे या फायलींवर लिहिले आहे." तो म्हणाला की ही फक्त लेबलं आहेत! या फायली इथे गेल्या तीन आठवड्यापासून आहेत, त्याची एवढी काय चिंता करतोयस तू?" एक घोषवाक्य आहे ते म्हणजे :
(आज करता येईल ते उद्या कर; उद्या करता येईल ते परवा कर; काय घाई आहे? आपण खूप जगणार आहोत!)
त्या काळी मी बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होतो. अर्जंट' म्हणून ठळक अक्षरात लिहिलेले कागदपत्र आठवड्यात मला एकादवेळा मिळायचे. मला ‘अत्यंत अर्जट'