पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ९ (९) तर आता प्रश्न असा की, शंकराचार्य व रामानुजाचार्यः । यांनी प्रतिपादन केलेले जे पारमार्थिक किंवा, या निबंधाच्या दृष्टीने, तत्त्वज्ञानविषयक विचार ते, श्रुतिग्रंथांचे ईश्वरप्रणीतत्व कबूल न करणारे जे वैदिक धर्माचे अनुयायी, त्यांना मान्य होण्या सारखे आहेत किंवा नाहीत ? अर्थातच, या प्रश्नाचा निर्णय करण्या करितां प्रथम, या निबंधाच्या प्रस्तुत भागाचा जो मुख्य प्रश्न, त्याचा विचार केला पाहिजे. तो प्रश्न असा की, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते, ब्रह्म झणजे काय, व ब्रह्मा चा जीवात्म्याशी व जगाशी संबंध कोणता ? शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी या प्रश्ना संबंधानें 'ज्या मताचे प्रतिपादन केले आहे, ते मत स्पष्टपणे समजण्या करितां, त्यांनी या प्रश्ना संबंधाने ज्या मतांचे खंडन किंवा निराकरण केले आहे, त्या मतांचे व त्या खंडनाचे संक्षिप्त रीतीने प्रथम विवेचन केळे पाहिजे. परंतु शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी वरील प्रश्ना संबंधानें कांहीं मतांचे निराकरण केले आहे, असे झटल्या बरोबर त्यांनी प्रतिपादित जें श्रुतिग्रंथांचे ईश्वरप्रणीतत्व त्याच्या संबंधाने एक नवीन गोष्ट लक्षात येते. त्या गोष्टी संबंधाने या ठिकाणी क्षणभर विचार करूं. || शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांच्याही मते श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत असून, तत्त्वज्ञान मिळविण्याला श्रुतिग्रंथ | पृष्ठ ४६-४७ प्रहा.