पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ८७ जी अग्निहोत्रादि साधने त्यांच्या पासून प्राप्त होणारे जे फळ ते अशाश्वत होय. उदाहरणार्थ, * इहलोकीं ज्या प्रमाणे कर्माच्या योगाने मिळविलेले फळ नाशवंत असते, त्या प्रमाणेच परलोकीं प्राप्त होणारे जे पुण्य कर्माचे फळ ते देखील नाशवंतच असते. उलट पक्षी, श्रेष्ठ जो पुरुषार्थ तो ब्रह्मज्ञाना पासून प्राप्त होतो, असे श्रुती मध्ये सांगितलेलें आहे. उदाहरणार्थ, १५ ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे, तो श्रेष्ठ पदाप्रत पावतो." ब्रह्म-अवगतिः हि पुरु घार्थः, नि:शेष-संसार- बीज--अविद्यादि-अनर्थ-निबर्हणात् ।। ( शारीरक भाष्य, १।१।१ ) ह्मणजे, “ ब्रह्मज्ञान प्राप्त होणे हा परमार्थ होय. कारण अविद्यादि जे अनर्थ तद्रूप जें संसाराचे बीज ते ब्रह्मज्ञानाच्या योगाने समूळ नष्ट होते.' | ( ७ ) ज्या प्रमाणे धर्माधर्मविषयक आचरणा संबंधार्ने शंकराचार्य व रामानुजाचार्य श्रुतिग्रंथ सर्वथैव प्रमाणभूत मानितात, त्या प्रमाणेच ते ब्रह्मविषयक ज्ञाना संबंधार्ने देखील ते ग्रंथ सर्वथैव प्रमाणभूत मानितात. या संबंधाने दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एक गोष्ट ही की, श्रुती मध्ये ब्रह्माचे अमुकच लक्षण केलेले आहे असे ते ह्मणतातः--अस्ति तावत् ब्रह्म नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभावं, सर्वज्ञ सर्वशक्ति-समन्वितम् ।। ( शारीरक भाष्य, १।१।१ ) ह्मणजे, 'ब्रह्म हे सर्वज्ञ व सर्वशक्ति असून ते स्वभावतःच अनादि, अनंत, शुद्ध, व मुक्त असे आहे.' अस्य जगतः....जन्म-स्थिति-भंगं यतः सर्वज्ञात् सर्वशक्तेः | १ ) या विषयींचे उतारे या निबंधांत पूर्वीच दिलेले आहेत.