पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ वैदिक तत्त्वमीमांसा हाराय ॥ (शारीरक भाष्य, १।१।४ ) ह्मणजे, * हिंसा वगैरे जी निषिद्ध कमें तीं आचरणे, एतत्-रूप जा अधर्म, तो आपल्या कडून आचारला जाऊ नये, या करितां त्या विषयीं देखील ज्ञान मिळविले पाहिजे. अनीतिविषयक सर्व कर्माचरणाचा या निषिद्ध कम मध्ये समावेश होतो. अर्थात् , अनीतिविषयक किंवा निषिद्ध कमी संबंधाने केव्हाही ‘पाहिजे त्या प्रमाणे वर्तन करण्याची श्रुतीने कोणालाच मोकळीक दिलेली नाहीं. आतां, एवढी गोष्ट खरी आहे कीं, इहलोकीं व परलोकीं सुखप्राप्तीला साधनीभूत अशी जी कम्य कर्मे ती, ज्याला इहलोकीच्या व परलोकींच्या सुखपभोगाची इच्छा असेल, त्याने करावी अशा प्रकारची एका अर्थ, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते, श्रुतीने मोकळीक दिलेली आहे. तथापि या संबंधाने देखील ही। गोष्ट विसरतां नये कीं, काम्य कर्मे केल्याने प्राप्त होणारे जें सुख ते क्षणिक व क्षुल्लक आहे; व मोक्षप्राप्तीला साधनीभूत असे जे कर्माचरण, त्या पासून ज्ञानप्राप्तीच्या द्वारा परिणाम प्राप्त होणारा जो ब्रह्मानंद तो नित्य व अनंत आहे; असे श्रुतीच्या आधाराने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी ठिकठिकाणी स्पष्टपणे प्रतिपादन केले आहेः–वेदः एव अग्निहोत्रादीनां श्रेयः-साधनानी अनित्य-फलतां दर्शयति । * तत् यथा इह कर्मचितः लोकः क्षीयते, एवं एव अमुत्र पुण्यचितः लोकः क्षीयते । इत्यादिः । तथा ब्रह्मविज्ञानात् अपि परं पुरुषार्थ दर्शयति । * ब्रह्मविद् आप्नोति परम्' इत्यादिः ॥ ( शारीरक भाष्य, १।१।१ ) ह्मणजे, *श्रुती मध्येच असे सांगितलेले आहे की, पुरुषार्थप्राप्तीचा