पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य मोठा असेल, त्या मानाने हा निर्णय करणे कठीण जाईल. अर्थातच, शंकराचार्यांची ( किंवा रामानुजाचार्यांची ) मते कोणती या विषयी निर्णय करणे ही गोष्ट या अर्थी कठीण आहे. परंतु वरील उताऱ्यांपैकी बाकीच्या दोन वाक्यांतील उद्गार शंकराचार्यांच्या ( किंवा रामानुजाचार्यांच्या ) मतांला लागू पडेल असे दिसत नाही. कारण निरनिराळ्या धर्मविषयक किंवा तत्त्वविषयक प्रश्नांसंबंधाने शंकराचार्यांची ( किंवा रामानुजाचार्यांची ) स्वतःची मते त्यांच्या ग्रंथांत इतक्या स्पष्टतेने व्यक्त झालेली आहेत की, इंग्रजी भाषेतील एका ह्मणीप्रमाणे, धांवत चालाणाऱ्याला देखील ती सहज वाचता येतील. ही गोष्ट खरी आहे की, शंकराचार्यांचे ( व रामानुजाचार्यांचे ) मुख्य ग्रंथ म्हटले झणजे उपनिषदें, ब्रह्मसुत्रे, व गीता या ग्रंथांवरील भाष्ये होत. आतां जर एकाद्या ग्रंथकाराचे मुख्य ग्रंथ भाष्यरूपच असले, तर सामान्यतः अशी शंका नेहमी राहते की, मूळ ग्रंथकाराच्या मतांपैकी कोणती मते त्या भाष्यकाराला मान्य होती व कोणती नव्हतीं. उदाहरणार्थ, डॉ. केअर्ड या नांवाचे जे पाश्चात्य पंडित इंग्लंदांत आहेत, त्यांचा सर्वात प्रसिद्ध व महत्वाचा ग्रंथ म्हटला ह्मणजे कॅट नामक जर्मन तत्त्वमीमांसकाच्या मतांचे भाष्य, अर्थातच, त्यांच्या या भाष्यरूप ग्रंथाचे आपण अध्ययन केले तर तेवढ्यानेच असे ह्मणता येणार नाहीं कीं,