पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य असली पाहिजेः--किमपि वक्तव्यं यत्-अनन्तरं ब्रह्म-जि- ज्ञासा उपदिश्यते । उच्यते । नित्य-अनित्य-वस्तु-विवेकः, इह अमुत्र अर्थ-भोग-विरागः, शम-दमादि-साधन-संपद् ; मुमुक्षुत्वं च । तेषु हि सत्सु....शक्यते ब्रह्म जिज्ञासितुं ज्ञातुं च, न विपर्यये ॥ ( शारीरक भाष्य, १।१।१ ) ह्मणजे, * जी स्थिति प्राप्त झाल्या नंतर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करावयाचा, अशी स्थिति कोणती ? या प्रश्नाला उत्तर असे की, हा प्रयत्न करण्याची योग्यता ह्मणजे नित्य वस्तु कोणती व अनित्य वस्तु कोणती या विषयीं निश्चय झालेला असला पाहिजे; इहलोकीं किंवा परलोकीं साध्य असां जो सुखोपभोग, त्या विषयींची आवड नष्ट झालेली असली पाहिजे; शम दम इत्यादि जी ज्ञानप्राप्तीची साधने तीं प्राप्त झालेली असली पाहिजेत; व मोक्षप्राप्ती विषयीं दृढ इच्छा उत्पन्न झालेली असली पाहिजे. एतत्-रूप जी योग्यता ती प्राप्त झालेली असेल तरच आत्मज्ञान मिळविण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करणे व ते प्राप्त होणे शक्य आहे, एरवीं नाहीं. ज्याच्या अंगी ही योग्यता आलेली असेल त्याच्या कडून ६ पाहिजे त्या प्रमाणे ' वर्तन केले जाण्याची शक्यता नाही असे सांगावयाला नको. । ज्यांच्या अंगीं वरील योग्यता आलेली नाही, त्यांनी कर्माचा त्याग करितां नये; अर्थात्, त्यांनी कर्माचरण केलेच पाहिजे. आतां, या सर्वांना लागू असा श्रुतील एक आचरणविषयक नियम हा की, निषिद्ध कर्म आचरणें एतत्-रूप जो अधर्म, तो करितां नयेः-अधर्मः अपि हिंसादिः प्रतिषेध-चोदना-लक्षणत्वात् जिज्ञास्यः परि