पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ वैदिक तत्त्वमीमांसा * ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले, त्याला कोणताच विधिनिषेध लागू नाहीं, ह्मणून त्याच्या कडून मनाला वाटेल तसे वर्तन केले जाण्याची भीति नाहीं. कारण अहंकार किंवा अभिमान हा मनाला वाटेल तसे वर्तन केले जाण्याला कारणीभूत आहे. परंतु ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले त्याचा सर्व अभिमान पूर्णपणे नष्ट झालेला असतो.' हे नीट समजण्या करितां पुढील वाक्य लक्षात ठेविले पाहिजेःहेय-उपादेययोः हि नियोज्यः नियोक्तव्यः स्यात् । आत्मनः । तु अतिरिक्त हेयं उपादेयं वा वस्तु अपश्यन् कथं नियुज्येत ॥ ( शारीरक भाष्य, २।३।४८) ह्मणजे, * त्याज्य किंवा प्राप्य अशा ज्या वस्तु आहेत त्यांच्या संबंधानें कोणाला झाला तरी विधि किंवा निषेध केला जातो. परंतु परमात्म्याहून भिन्न अशी कोणतीच त्याज्य किंवा ग्राह्य वस्तु ज्याला दिसत नाहीं, त्याला विधिनिषेध कसा केला जाईल. या वरून असे स्पष्ट होते की, शंकराचार्यांच्या मते ज्याला श्रुतींतील कोणताच विधिनिषेधरूप उपदेश लागू नाहीं असा आत्मज्ञानी ह्मणजे ज्याला सर्व परमात्ममय झाले आहे तो, - दुसरी लक्षात ठेवावयाची गोष्ट ही की, या अर्थी जें आत्मज्ञान ते प्राप्त करून घेण्या करितां कर्माचरणाचा किंवा गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याची, शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांच्याही मते, श्रुती मध्ये परवानगी आहे. परंतु ही गोष्ट जरी खरी, तरी पाहिजे त्याला तो त्याग करितां येत नाही. कारण शंकराचार्यांनी शारीरक भाष्यांत असे स्पष्ट झटले आहे की, गृहस्थाश्रम टाकून ज्ञाननिष्ठेचे अवलंबन करितां येण्या साठी पुढील योग्यता अंगीं झालेली