पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ वैदिक तत्त्वमीमांसा त्या विषया संबंधाने ती प्रमाणभूत नव्हे. कारण अदृष्ट विषयाचे ज्ञान करून देणे हाच प्रामाण्याचा हेतु होय. ' । प्रस्तुत विषया संबंधाने येथ पर्यंत तीन गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट ही कीं, इतर प्रमाणांच्या योगाने पर मार्थविषयक ज्ञान प्राप्य नाहीं, ह्मणून त्या ज्ञाना संबंधानें श्रुति प्रमाण मानिली पाहिजे, दुसरी गोष्ट ही की, जर तें ज्ञान इतर प्रमाणांनीं प्राप्य असते, तर त्याच्या संबंधाने श्रुति प्रमाण मानणे आवश्यक झाले नसते. आणि तिसरी गोष्ट ही की, जे विषय प्रत्यक्षदि प्रमाणांच्या योगानें ज्ञेय आहेत, त्या विषयां संबंधानें ज्ञान करून देणे हा श्रुतीचा हेतु नव्हे, व त्या विषय संबंधाने श्रुति प्रमाणभूत नव्हे. आतां प्रस्तुत विषया संबंधाने चवथी गोष्ट ही की, सृष्टि ही स्वभावतःच प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय आहे, असे शंकराचार्यांनीं । झटले आहेः-स्वभावतः बिषय–विषयाणि इन्द्रियाणि, न ब्रह्म-विषयाणि । सति हि इन्द्रिय-विषयत्वे ब्रह्मणः, इदं ब्रह्मणा संबद्ध कार्य इति गृह्येत । कार्यमाचं एव तु गृह्यमाणं, किं ब्रह्मणा संबद्धं किं अन्येन केनचित् वा संबद्ध इति न शक्यं निचेतुम् ॥ ( शारीरक भाष्य, १।१।२ ) झणजे, “सृष्ट पदार्थ हे स्वभावतःच इंद्रियांचे विषय आहेत, त्या प्रमाणे ब्रह्म हा त्यांचा विषय नव्हे. जर ब्रह्म देखील इंद्रियगोचर असते, तर जग में ब्रह्माचे कार्य, असे ( श्रुतीच्या साहाय्या शिवाय ) समजणे शक्य झाले असते, परंतु ज्या अर्थं सृष्टिरूप जें कार्य ते मात्र ( श्रुतीच्या साहाय्या शिवाय ) ज्ञेय आहे, त्या अर्थी ते ब्रह्माचे काये । किंवा दुस-या कोणाचे कार्य, या विषयों ( श्रुतीच्या सा