Jump to content

पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैदिक तत्त्वमीमांसा रामानुजाचार्य यांच्या वेदांतविषयक मतांसंबंधानें कांहीं विवेचन या निबंधाच्या प्रस्तुत भागांत करावयाचे आहे. परंतु शंकराचार्य आण रामानुजाचार्य यांच्या मतांसंबंधाने विवेचन करावयाचे, असें ह्मटल्याबरोबर एक शंका उत्पन्न होते. ती शंका अशी की, शंकराचार्यांची किंवा रामानुजाचार्याची मतें झणजे कोणती मते समजावयाचीं ? 'विविधज्ञानविस्ताराच्या' फेब्रुवारी १९०४ च्या अंकांत एका बंगाली मासिक पुस्तकांतील निबंधाचा तर्जुमा 'शंकराचार्यांचे अद्वैतदर्शन' या नावाखालीं प्रसिद्ध झाला आहे. त्यांत असे झटलें आहेः-‘आचार्यांची मते निश्चित करण्याचे काम एक अडचण आहे; ती अशी की, त्यांनी आपली मते स्वतंत्र रीतीने कोठे सांगितलेली नाहीत. व्याख्या करितां करितां प्रसंगोपात्त विषयविन्यासानुसार त्यांनी आपली मतें प्रदर्शित केली आहेत....ह्मणून आचार्यांच्या सगळ्या ग्रंथांचे सूक्ष्म निरीक्षण करूनच त्यांची मते हुडकून काढिली पाहिजेत'. "आतां या उताऱ्यातील शेवटच्या वाक्यांत निर्दिष्ट केलेली गोष्ट खरी आहे, असे कबूल केले पाहिजे. परंतु ती गोष्ट मोठमोठ्या सर्वच ग्रंथकारांना लागू पडते. कारण कोणत्याही नामांकित ग्रंथकाराची मते काय आहेत, या विषयीं निर्णय करा याचा तो त्या ग्रंथकाराच्या सर्व ग्रंथांचे सूक्ष्म निरीक्षण । करूनच केला पाहिजे. आणि ज्या मानाने या ग्रंथकाराच्या ग्रंथांची संख्या मोठी असून प्रत्येक ग्रंथाचा विस्तारही