पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ वैदिक तत्त्वमीमांसा आवश्यकता नाही. परंतु ख्रिस्ती धर्माधिका-यांना असे प्रतिपादन करणे भाग पडल्या मुळे खिस्ती धर्म के पदार्थविज्ञानशास्त्र यांच्या मध्ये, ख्रिस्ती धर्माच्या आरंभ पासून अद्याप पर्यंल, झगडा चालू राहून बहुतेक प्रसंग ख्रिस्ती धर्मालाच हार घ्यावी लागते. कारण बायबल मध्ये जे सृष्टिविषयक विचार समाविष्ट झालेले आहेत, त्यां पैकी अनेक विचार वस्तुस्थितीच्या विरुद्ध, आणि ह्मणून असत्य, आहेत असे आतां निःसंशयपणे सिद्ध झाले आहे. अर्थातच, या मुळे बायबलाचे ईश्वरप्रणीतत्व प्रतिपादन करणे अशक्य होत चालले आहे. | परंतु पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रगतीचा व अध्ययनाचा बायबलादि ग्रंथांच्या ईश्वरप्रणीतत्वा संबंधानें जो परिणाम होतो त्याच्याशी आपणांला या निबंधांत कांहीं कर्तव्य नाही. आपण लक्षात ठेविली पाहिजे ती गोष्ट ही कीं, वैदिक धर्माचे श्रुतिनामक जे मूळ ग्रंथ ते ईश्वरप्रणीत आहेत, असे जे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी प्रतिपादन केले आहे त्याला, पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रगतीने किंवा अध्ययनाने, केव्हाही बाध येणे शक्य नाही. कारण त्यांनी ते मत अशा रीतीने प्रतिपादन केले आहे की, जरी ल्या मतान्वयें श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत असे मानले, तरी त्या ग्रंथांतील कोणत्याही विचाराचा पदार्थविज्ञानशाखांतील कोणत्याही विचाराशी केव्हाही विरोध येणे शक्य नाही. ही गोष्ट पुढील विवेचना वरून स्पष्टपणे समजेल. * प्रथम ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, सृष्टिविषयक ज्ञान मिळविण्याला साधनीभूत जी प्रत्यक्षादि प्रमाणे किंवा