पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य जे मूळ ग्रंथ ते ईश्वरप्रणीत नव्हते, असे ज्यांना प्रतिपादन करावयाचे असेल, त्यांना भापला पक्ष सिद्ध करण्याचा एकच मार्ग मोकळा आहे; आणि तो मार्ग हा की, श्रुतिग्रंथांत ज आचारविषयक व ज्ञानविषयक विचार आहेत, ते सर्वच सत्य नाहींत असे सिद्ध करणे. कारण जर या ग्रंथांतील कांहीं विचार असत्य आहेत असे निःसंशय रीतीने सिद्ध केले गेले, तर ते ग्रंथ ईश्वरप्रणीत नव्हत असे सिद्ध होईल. कारण पूर्ण ज्ञानी जे ऋषि, त्यांना अंतर्ज्ञानाने ते विचार उपलब्ध झाले,-वे ते विचार उपलब्ध व्हावे या हेतूने परमेश्वराने त्या ऋषींना उत्पन्न करून योग्य सामथ्र्य दिले, ही गोष्ट जर खरी तर त्या विचारां पैकी कोणताही विचार असत्य असतां नये. आणि या मुळेच, श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत असे जे प्रतिपादन करितात, त्यांना असे देखील प्रतिपादन करावे लागते की, त्या ग्रंथांतील कोणताही विचार असत्य नाहीं; किंवा त्यांतील कोणतेही विचार परस्पर विरुद्ध नाहींत. कारण परस्पर विरुद्ध अशा कोणत्याही दोन विचारां पैकी एक विचार अ सत्य असलाच पाहिजे, असा नियम आहे. । ख्रिस्ती धर्माचा बायबल नामक जो मूळ ग्रंथ, तो ईश्वरप्रणीत आहे अशी खिस्ती धर्माच्या अनुयायांची श्रद्धा असल्या मुळे त्यांना असे प्रतिपादन करणे भाग पडते की, बायबलांतील प्रत्येक विचार सत्य आहे; आणि ह्मणून बायबलांतील कोणत्याही विचाराच्या विरुद्ध जो विचार तो त्या विरोधा मुळेच असत्य असला पाहिजे,-ता असत्य आहे किंवा नाही या विषयीं स्वतंत्र रीतीने विचार करण्याची