७८ वैदिक तत्त्वममांसा - (३) प्रस्तुत विषया संबंधाने तिसरी लक्षात ठेवावयाची गोष्ट ही की, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते वेदादि श्रुतिग्रंथ एकाच ऋषीला एकाच काळीं उपलब्ध झाले नाहीत; तर वेदादि श्रुतिग्रंथांचे जे मंत्रादि निरनिराळे भाग ते निरनिराळ्या ऋषींना निरनिराळ्या काळीं उपलब्ध झाले. ही गोष्ट वरील विवेचना वरून स्पष्ट होते. आणि ही गोष्ट लक्षात ठेविली ह्मणजे असे दिसून येईल की, ज्या प्रमाणें । बायबलादि ग्रंथांचे ऐतिहासिक पद्धती ( Historical Method किंवा Higher Criticism ) ने अध्ययन केले जाऊ लागल्या पासून त्या ग्रंथांच्या ईश्वरप्रणीतत्वा संबंधानें संशय उत्पन्न होत आहे; त्या प्रमाणे जरी वैदिक श्रुतिग्रंथांचे त्या पद्धतीने अध्ययन केले गेले, तरी त्या मुळे त्यांच्या ईश्वरप्रणीतत्वाला बाध येणे शक्य नाही. कारण या पद्धतीने कोणत्याही ग्रंथाचे अध्ययन केले गेले असतां जो निर्णय क़रितां येतो तो एवढ्याच प्रश्ना संबंधानें कीं, तो ग्रंथ एकाच व्यक्ती कडून एकाच वेळी निर्माण केला गेला किंवा नाही ? परंतु वरील विवेचना वरून असे लक्षात येईल की, ऐतिहासिक पद्धतीने अध्ययन केले गेल्या मुळे असे जरी आढळून आले की, श्रुतिग्रंथांतील कोणतं ही दोन वचने देखील एकाच व्यक्ती कडून एकाच काळी निर्माण केली गेली नाहीत, तरी तेवढ्याच मुळे त्या ग्रंथांचे ईश्वरप्रणीतत्व बाधित होऊ शकणार नाहीं. । ( ७ ) । ( ४ ) वरील विवेचन ज्या मानाने निर्दोष असेल त्या मानाने असे स्पष्ट होते की, वैदिक धर्माचे श्रुति नामक
पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/74
Appearance