पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ६९ नाहीं. कारण वेदांतील या वचनांला अनुसरूनच, निरनिराळीं कांडे, सूक्ते, व मंत्र करणारे जे ऋषि त्यांच्या आकृति व शक्ति आपल्या मनांत आणून, प्रजापति त्या त्या आकृतींनीं व शक्तींनी युक्त अशा त्या ऋषींना उत्पन्न करिते; व त्या त्या मंत्रादिकांचे * स्मरण ' करण्याच्या काम त्यांची योजना करितो. नंतर ज्यांना प्रजापती कडून सामर्थ्य प्राप्त झालेले आहे असे ते ऋषि, आपापल्या कार्याला योग्य असे तप आचरून, पूर्व युगांतील वसिष्ठादि ऋषींना जे मंत्र वगैरे उपलब्ध झाले होते, तेच त्या त्या वसहित व स्वरांसहित, त्यांचे अध्ययन केल्या शिवाय, स्वतःच्या सामथ्र्याने पाहतात. आणि या करितां वेदांचे नित्यत्व व ऋषींचें वेदकर्तृत्व या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध नाहींत.' एतत् एव च वेदस्य अपौरुषेयत्वं नित्यत्वं च, यत् पूर्व-पूर्व-उच्चारण-क्रम-जानित-संस्कारेण तं एवं क्रम-विशेष स्मृवा, तेन एव क्रमेण उच्चार्यत्वम् । तत् अस्मासु सर्वेश्वरै अपि समानम् । इयान् तु विशेषः । संस्कार-अनपेक्षं एवं स्वयं एवं अनुसन्धत्ते पुरुषोत्तमः ॥ ( श्रीभाष्य, १।३।२९ ) ह्मणजे, “ बेद हे अपौरुषेय व नित्य आहेत, या सिद्धांताचा अर्थच असा की, पूर्व युगां मध्ये क्रमाने वेदपठन केलेले असल्या मुळे उत्पन्न होणारा जो संस्कार, त्या संस्कारा मुळे त्याच क्रमाचे स्मरण होऊन, त्या क्रमानेच उच्चारण केले जाणे. हे क्रमाचे स्मरण व क्रमशः उच्चारण, या संबंधानें ऋषि व परमेश्वर यांच्या मध्ये भेद नाहीं. त्यांच्या मध्ये भेद एवढाच की, परमेश्वर पूर्व जन्मींच्या संस्कारा शिवाय ही गोष्ट करू शकतो.'