पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ६७ पक नव्हता, तर केवळ तपाने त्यांना वेद कसे उपलब्ध झाले ? अशी शंका येईल ह्मणूनं ६६ परमेश्वराच्या प्रसादानें ! असें ह्मटलें आहे.' ह्मणजे ऋषींनी कितीही तप केले असते, तरी ईश्वरप्रसादाच्या अभावी त्यांना वेदां विषयीं अंतर्ज्ञान कदापि प्राप्त झाले नसते. अर्थात् , ईश्वराने त्यांच्या बुद्वीच्या ठिकाणी वेदांचा प्रादुर्भाव केला, असेच झटले पाहिजे. वरील विवेचना वरून असे निःसंशयपणे स्पष्ट होते की, वेद ईश्वर प्रणीत आहेत. या सिद्धांताचा अर्थ असा की, ऋषींना या युगाच्या आरंभीं ईश्वराच्या प्रसादाने वेदांचे अंतर्ज्ञान झालें. अर्थात् , या उपलब्धिरूप साधना संबंधाने ऋषींना प्राप्त झालेले वेद व खन्या कवींनी केलेली खरी काव्ये, यांच्या मध्ये फरक नाहीं. कारण ऋषी प्रमाणेच कवींना तप करून आपली अंतर्ज्ञानशक्ति सुसंस्कृत करावी लागते; ऋषींना वेदविषयक अंतर्ज्ञान झाले, त्या प्रमाणेच कवींना काव्यविषयक अंतर्ज्ञान होते; आणि ऋषींना ईश्वराच्या प्रसादा मुळे वेदविषयक अंतर्ज्ञान झालें, त्या प्रमाणेच कवींना ईश्वराच्या प्रसादा मुळेच काव्यविषयक अंतज्ञान होते. आणि या सर्व गोष्टीं संबंधानें कवि व ऋषि यांच्या मध्ये साम्य असल्या मुळेच, ज्या प्रमाणे काव काव्यकर्ते मानले जातात त्या प्रमाणेच ऋषि वेदकर्ते किंवा मंत्रकर्ते मानिले जातात. या दोहों मध्ये भेद एवढाच की, ऋषींची बुद्धि पूर्णपणे सुसंस्कृत झालेली असून त्यांना जे वेद या युगाच्या आरंभीं अंतर्ज्ञानाने उपलब्ध झाले, तेच वेद तशाच रूपाने पूर्वीच्या युगांत विद्यमान होते. कवींची बुद्धि तशी नसून त्यांना जी काव्ये अंतज्ञानाने उपलब्ध