पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई ६६ वैदिक तत्त्वमीमांसा उपलब्ध झाले. परंतु ईश्वराने किंवा ईश्वराच्या तर्फे । दुस-या कोणी ते वेद प्रजापतीच्या ( लौकिक अर्थी )। स्वाधीन केले नाहीत; तर ते त्याला अंतज्ञानाने प्राप्त झाले ( मनसि प्रादुर्बभूवुः ). हीच गोष्ट * यो ब्रह्माणं विदधाति । इत्यादि वेचनाच्या व्याख्याना वरून स्पष्ट होते. या वचनांत असे ह्मटलें आहे की, ज्याला शरण गेले असतां मुक्तिरूप उच्चतम पुरुषार्थ प्राप्त होतो असा जो देव, त्याने प्रजापतीला प्रथम उत्पन्न करून त्याला वेद दिलेः–यः ब्रह्माणं विदधाति पूर्वे, यः वै वेदान् च प्रहिणीति तस्मै ॥ गोविंदानंदांनीं रत्नप्रभे मध्ये या वचनाचे असे स्पष्टीकरण केले आहेः-पूर्वे कल्पादौ सृजति तस्मै ब्रह्मणे प्रहिणोति गमयत्नि तस्य बुद्धी वेदान् आविर्भावयति यः ॥ ( शारीरक भाष्य, १।३।३० ) ह्मणजे, ज्याने प्रस्तुत युगाच्या आरंभी प्रजापतीला उत्पन्न करून त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी वेदांचा आविर्भाव केला. या वाक्यातील, ज्याने त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी वेदांचा आविर्भाव केला,' या शब्दांचा तात्पर्यार्थ असा की, प्रजापतीला जे वेदांचे अंतर्ज्ञान झाले ते देवाच्या सामर्थ्याने किंवा प्रसादानें झालें. कारण 'युगान्ते' इत्यादि वचनांत असे सांगितलेलें आहे की, ऋषींना जे वेद प्राप्त झाले ते त्यांच्या तपाच्या योगाने व परमेश्वराच्या प्रसादा मुळे प्राप्त झाले. या वचनाचे स्पष्टीकरण करितांना आनंदगिरींनी असे झटले आहे कीं:-तपसा अपि न तत्-लाभः, अध्यापक-अभावात् । इति आशंक्य आह-* अनुज्ञताः इति ।। । झणजे, * जर त्या वेळी ऋषींना शिकविणारा कोणी अध्या