पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैदिक तत्त्वमीमांसा [१] शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ( १ ) वैदिक वाङ्मयामध्ये जे तत्त्वविचार आहेत त्या सर्वांचा या निबंधांत 'वैदिक तत्त्वमीमांसा' या नावाखालीं समावेश केला आहे. या अर्थी जी वैदिक तत्त्वमीमांसा तिच्या,-पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा किंवा वेदांत, सांख्य, योग, न्याय, आणि वैशेषिक अशा,-सहा मुख्य शाखा आहेत, ही गोष्ट सुप्रसिद्धच आहे. या सहा शाखांना सहा दर्शनें ह्मणतात. या सहा दर्शनांपैकी वेदांतदर्शनावर ( ह्मणजे ब्रह्मसूत्रांवर ) शंकराचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, आणि मध्वाचार्य या चार आचार्यांनी भाष्ये केली आहेत. व या चार भाष्यांमध्ये वेदांतदर्शनांतील कांहीं मुख्य सिद्धांतांचा अर्थ थोडा बहुत भिन्न भिन्न केला गेल्यामुळे, वेदांताला चार रूपांतरें प्राप्त झाली. वेदांताचीं हीं रूपांतरें केवल 'अद्वैत, 'शुद्ध अद्वैत', 'विशिष्ट अद्वैत',आणि 'द्वैत' या नांवांनी प्रसिद्ध आहेत. या निबंधाच्या प्रस्तुत भागाला ' शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ' असे नांव दिले आहे, त्यावरून वाचकांना अशी कल्पना सहजच करितां येईल की, शंकराचार्य आणि