पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ५७ वैद्यः ॥ (श्रीभाष्य, १।२।१ ) ह्मणजे, ' प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने ज्याच्या विषयांचे ज्ञान प्राप्त होणे अत्यंत अशक्य, असा इतर सर्व वरतूहून भिन्नस्वभाव जौ, ब्रह्म किंवा पुरुषोत्तम या नांवांनी प्रसिद्ध, नारायण त्याच्या विषयींचेच श्रुती मध्ये प्रतिपादन केलेले आहे. अर्थात् , त्या संबंधाने श्रुतिच प्रमाण मानली पाहिजे.