पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ वैदिक तत्त्वमीमांसा । मतांचे खंडन करून, त्या मतां मध्ये असलेल्या दोषां पासून मुक्त असे प्रधान-कारण-वाद नामक मत आम्ही प्रतिपादन करितो. परंतु केवळ तर्कवर स्थापन झालेल्या मताच्या योगाने मोक्ष प्राप्त होणे अशक्य, हा आक्षेप या मताने देखील टळणार नाही. कारण ज्याने हे मत स्थापन केॐ त्याच्या पेक्षा अधिक कुशळ असा कोणी तर्कवादी अन्य स्थळी किंवा अन्य काळी आपल्या तकच्या योगाने, प्रधान-कारण-वाद हे मत देखील सदोष आहे, असे सिद्ध करून दाखविणार नाही, असे समजण्याला काय आधार आहे ? अर्थात् , तकने स्थापन केलेल्या या मताला देखील कायमपणा नाही. या करितां इंद्रियांना गम्य नव्हे अशा विषयाच्या ज्ञाना संबंधाने श्रुतिच प्रमाण मानिली पाहिजे.' वरील उता-यांत ब्रह्म हैं अतींद्रिय आहे,-ह्मणजे ते इंद्रियांचा विषय नव्हे, असे रामानुजाचार्यांनी झटले आहे. हीच गोष्ट त्यांनी दुस-या ठिकाणीं अधिक स्पष्टपणे व्यक्त केली आहे. उदाहरणार्थः परं ब्रह्म सकल-इतर–प्रमाणअविषयतया शास्त्र-एक--प्रमाणकत्वम् ॥ (श्रीभाष्य, १।२।१) ह्मणजे, * प्रत्यक्षादि जी ज्ञान मिळविण्याची साधने त्यांचा ब्रह्म हा विषय नसल्या मुळे, ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त करून घेण्याला श्रुति हेच एक साधन आहे. अतिपतितसकल-इतर–प्रमाण–संभावना-भूमिः स्व-इतर-समस्तवस्तु-विलक्षणः परं ब्रह्म पुरुषोत्तमः नारायणः एव वेदान्त