पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ५१ ५६ क. त्या प्रकारचे जे इतर तर्क त्यांना देखील,-- अर्थात् कोणत्याही तर्कदा, कायमपणा नाहीं. पुनः, कोणत्याच तर्कला कायमपणा नाहीं,-आणि ह्मणून सर्वच तर्क अविश्वसनीय,-असे जर कबूल केले, तर सर्व व्यवहार बंद पडेल, कारण व्यवहार ह्मणजे वर्तमान व भूत काळच्या अनुभवानें भविष्य काळच्या सुख प्राप्ती विषयीं व दुःखनिवारणा विषयी तजवीज करणे. इतकेच नव्हे, तर परस्परां विरुद्ध दिसणान्या श्रुतिवचनांच चुकीचा अर्थ कोणता व खरा अर्थ कोणता या विषयी निर्णय करणें हें, मूळ वाक्यांच्या अर्थाचे निरूपण करणे एतत्-रूप जो तर्क, त्या तकच्या योगानेच शक्य होते.' | इतकेंच नव्हे, तर तर्कवादी आपल्या तर्फेने आणखी असेही म्हणेलः-- अयं एवं तकस्य अलंकारः यत् अप्रतिष्ठितत्वं नाम । एवं हि सावद्य-तर्क–परित्यागेन निरवद्यः तर्कः प्रतिपत्तव्यः भवति । न हि पूर्वजः मूढः आसीत् इति आत्मना अपि मूढेन भवितव्यं इति किंचित् अस्ति प्रमाणम् । तस्मात् न तर्क-अप्रतिष्ठानं दोषः ॥ ( शारीरिक भाष्य, २।१।११ ) ह्मण जे, “ तुह्मी ज्याला तकाचे अप्रतिष्ठितत्व ह्मणतां तें तकच्या दोषाचे चिन्ह नव्हे तर, उलट, ते तकचे एक प्रशस्य अंग आहे. कारण तर्कला कायमपणा नाही या मुळेच सदोष तर्क टाकून निर्दोष तकीचे अवलंबन करणे शक्य होते. आपल्या पूर्वजांन सदोष मतांचे ग्रहण केलें एवढ्याच करितां आपण देखील त्याच मतांचे ग्रहण केले पाहिजे, असे ह्मणण्याला काहीच आधार नाहीं. सारांश, तर्कला कायमपणा नाही, हा तर्काचा दोष नव्हे,