पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० वैदिक तत्त्वमीमांसा पणा असणे शक्य नाही. असे देखील ह्मणतां येत नाहीं की, कपिलाला किंवा दुस-या एकाद्या प्रसिद्ध माहात्म्याला संमत असे जे तर्क, ते कायम होत. कारण असे प्रसिद्ध माहात्मे अनेक होऊन गेले आहेत. व अनुमानाच्या योगाने त्यांना प्रतिपादन केलेले सिद्धांत परस्पर विरुद्ध आहेत. परंतु तकाला कायमपणा नाही, हा जो शंकराचार्यांनी घेतलेला तकच्या विरुद्ध आक्षेप, त्याच्या संबंधानें कोणी तर्कवादी असे निराकरण करील कीं, तकला कायमपणा नाहीं हे झणणे अनुभवाविरुद्ध आहे; आणि जर हैं ह्मणणे सत्य असते तर सर्व व्यवहार अशक्य झाला असता:-न हि प्रतिष्ठितः। तर्कः एव न अस्ति, इति शक्यते वक्तुम् । एतत् अपि हि तकण अप्रतिष्ठितत्वं तर्केण एव प्रतिष्ठ प्यते । केषांचित् तर्कण अप्रतिष्ठितत्व-दर्शनेन अन्येषां अपि तत्-जातीयकानां तकण अप्रतिष्ठितत्व-कल्पनात् । सर्व-तर्क - अप्रतिष्ठायां च लोक-व्यवहार-उच्छेद-प्रसंगः । अतीतवर्तमान-अध्व-साम्येन हि अनागते अपि अध्वनि सुख-दुः- ख-प्रति-परिहाराय प्रवर्तमानः लोकः दृश्यते । श्रुति-अर्थविप्रतिपत्तौ च अर्थ-आभास–निराकरणेन सम्यक्-अर्थनिर्धारणं तर्केण एव वाक्य-वृत्ति-निरूपण-रूपेण क्रियते ।। ( शारीरकभाष्य, २॥ १।११ ) ह्मणजे, १ ज्याला कायमपणा आहे असा तर्कच नाही, असे प्रतिपादन करणे ठीक नव्हे. कारण तकला कायमपणा नाही, हा सिद्धांत देखील तकच्या योगानेच सिद्ध केला जाते. झणजे कांहीं तकना कायमपणा नाही असे पाहून व्या वृरून असा सामान्य सिद्धांत प्रतिपादिला जातो