पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ वैदिक तत्त्वमीमांसा व परिस्थिति यांच्या संबंधाने धर्मा विषय व अधर्मा विषय नियमितपणा नाही. म्हणजे विवक्षित स्थळ, काळ, व परिस्थिति, यांच्या संबंधानें जें आचरण करणे म्हणजे धर्माचरण असेल तेच आचरण, अन्य स्थळी किंवा अन्य काळी किंवा अन्य परिस्थिती मध्ये केले गेले असतां, अधर्माचरण होते. या करितां धर्मशास्त्राच्या मदती शिवाय । धर्मा विषयी व अधर्मा विषयी ज्ञान प्राप्त होणे कोणालाही शक्य नाहीं. ' वरील उताच्या वरून असे स्पष्ट होते की, ज्या विषया संबंधाने आपणांला ज्ञान प्राप्त होणे इष्ट किंवा आवश्यक असून ते ज्ञान प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने प्राप्त होणेंड शक्य नाही, त्या विषया संबंधाने ज्ञान प्राप्त होण्याला श्रुति हेच एक साधन आहे, असे शंकराचार्यांचे मत, आती पूर्वी निर्दिष्ट केल्या प्रमाणे, शंकराचार्यांच्या मते, ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होणे हे मनुष्याला अत्यंत = वश्यक आहे. परंतु ब्रह्म हे प्रत्यक्षादि प्रमाणांचा विषय असणे शक्य नाही. अर्थात् , ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होण्याला श्रुतिच एक साधन आहेः तस्मात् सिद्धं ब्रह्मणः। शास्त्र-प्रमाणकत्वम् ॥ ( शारीर कभाष्य, १।१।१ ) झणजे, * ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने शास्त्र प्रमाणभूत होय, असे सिद्ध झालें. । परंतु या प्रमाणे जर ब्रह्मावषयक ज्ञान श्रुतिग्रंथाच्या साहाय्यानेच प्राप्त होणे शक्य आहे, तर अर्थातच ते ज्ञान प्रत्यक्ष-अनुमानादि प्रमाणांच्या योगानें प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे हे शंकराचार्यांच्या मते अयोग्य होयः- वा