पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ शैकराचार्य आणि रामानुजाचार्य कारण विधि आणि निषेध,-अमुक कर्म करावे आणि अमुक कर्म करूं नये,-या संबंधानें निरूपण करणे एवढाच धर्मग्रंथांचा मुख्य उद्देश असतो. या वरून असे स्पष्ट होते की, धर्मग्रंथ मध्ये ब्रह्मा विषय जें निरूपण केलेले आहे ते ब्रह्मज्ञान कर्माचरणाचे साधन असल्या मुळे केलेलें आहे. परंतु हे मत ग्राह्य नाही, कारण कर्माचरण आणि ब्रह्मज्ञान यांच्या पासून प्राप्त होणारी फळे परस्परांहून अत्यंत भिन्न आहेत. धार्मिकतेच्या व अधार्मिकतेच्या कमीअधिक प्रमाणाने प्राप्त होणारे जे संसाररूप कमी अधिक सुखदुःख, ते अशाश्वत असते. परंतु ज्यांनी ज्यांनी मोक्षा संबंधाने प्रतिपादन केले आहे, त्या सत्रंच्या मते मोक्ष नामक जे फळ ते शाश्वत आहे. अर्थात् , ते फळ कर्माचरणाच्या योगाने साध्य नसल्या मुळे, ब्रह्मज्ञान हैं। कर्माचरणाचे साधन आहे, असे प्रतिपादन करणे योग्य नव्हे. दुसरे असे की, ** ब्रह्मज्ञानाने ब्रह्मत्व प्राप्त होते, ११ इत्यादि श्रुतिवचने असे स्पष्ट दाखवितात की, ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्या बरोबर मोक्ष प्राप्त होतो. अर्थात् , ज्ञानप्राप्ति व मोक्षप्राप्ति यांच्या मध्यें कर्माचरणाला अवसर मिळणेच शक्य नाही. या वरून असे सिद्ध होतें कीं, मुक्ति प्राप्त होण्याच्या संबंधाने एक ज्ञान शिवाय करून कर्माचरणाचा तिळमात्र देखील उपयोग होणे शक्य नाही.' या संबंधानें रामानुजाचार्यांची पुढील सारख वाक्ये - हेतः-इदानीं विद्यातः पुरुषार्थः, उत विद्या-अंगकात् कर्मणः, इति चिन्यते । किं युक्तम् । अतः विद्यातः पुरुषार्थः इति भगवान् बादरायणः मन्यते । कुतः । शब्दात् । दृश्यते