पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैदिक तत्त्वमीमांसा मोक्ष प्राप्त होतो. तस्मात् अनादि-कर्म--प्रवाह-रूपअज्ञान-मूलत्वात् बन्धस्य, तु–निबर्हणं उक्त-लक्षण-ज्ञानात् एव ॥ ( श्रीभाष्य, १।१।१ ) ह्मणजे, * अनादि काळा पासून वाहत आलेला जो कर्माचा प्रवाह तत्-रूप जें अज्ञान ते बंधनाचे कारण असल्या मुळे, त्या बंधनाचा नाश पूर्वी निर्दिष्ट केलेल्या ज्ञानाच्या योगानेच होईल,' अतः केवलानां कर्मणां अल्प-अस्थिर–फलत्वात् ब्रह्म-ज्ञानस्य च अनन्त-स्थिर–फलत्वात् , तत्–निर्णय-फलः ब्रह्म-विचारआरंभः युक्तः इति स्थितम् ।। (श्रीभाष्य, १।१।१ ) ह्मणजे, * असे ठरलें कीं, केवळ कर्माचरणा पासून जे फळ प्राप्त होते ते अल्प व अशाश्वत असते, आणि ब्रह्मज्ञाना पासून जें फळ प्राप्त होते ते नंत व शाश्वत असते; या करित ज्या पासून ब्रह्म ह्मणजे काय ? या विषयी निर्णय होईल असे जे ब्रह्मा संबंधाने विवेचन त्या विवेचनाला आरंभ। करणे इष्ट आहे.' या प्रमाणे, मनुष्याचें जें अंतिम लक्ष्य ते ज्ञानाच्या योगानें प्राप्त होते,-वे वळ कर्माचरणाने प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन करण्या संबंधाने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मध्य मतैक्य आहे इतकेच नव्हे, तर या संबंधाने तिसरें जें एक मत की, कर्माचरण व ज्ञान यांच्या समुच्चयानें परम पुरुषार्थ प्राप्त होतो, किंवा ज्ञान हें कर्मचे अंग किंवा साधन,-त्या मताचा देखील शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांनीही स्पष्टपणे निषेध केला आहे. उदाहरणार्थ, शंकराचार्यांनी असे प्रतिपादन केले आहे:- तत्र केचित् आहुः । सर्व-कर्म-संन्यास-पूर्वकात् आत्मज्ञान