पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३७ क्षेय होतो." ८६ अंशाश्वत असे जे कर्माचरण त्याच्या यागाने शाश्वत फळ प्राप्त होणे शक्य नाहीं, ५ इत्यादि श्रुतिवचने असे स्पष्ट सांगतात की, केवळ कर्माचरणा पासून प्राप्त होणारे जे फळ ते अशाश्वत होय.' ज्या गोष्टी संबंधाने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मध्ये मतैक्य अहे, त्यां पैकी दुसरी गोष्ट हा की, केवळ कर्मचरणाने असाध्य असे जें मनुष्याचे अंतिम लक्ष्य, ते ज्ञानाच्या योगाने साध्य आहे. ही गोष्ट शंकराचायनी पुढील सारख्या वाक्यांत निर्दिष्ट केली आहेः-तस्य अस्य गीता--शास्त्रस्य संक्षेपतः प्रयोजनं परं निःश्रेयसम्":"। तत् च सर्व-कर्म-संन्यास-पूर्वकात् आत्मज्ञान-निष्ठारूपात् धर्मात् भवति ॥ ( गीताभाष्य, उपोद्घात ) ह्मणजे, “ सर्व गीताशास्त्राचा उद्देश एका शद्वाने सांगावयाचा ह्मणजे मनुष्याचे जें सर्वत श्रेष्ठ किंवा अंतिम लक्ष्य ते त्याला प्राप्त करून घेतां यावे आणि हे अंतिम लक्ष्य प्राप्त करून घ्यावयाचे साधन झटलें ह्मणजे ज्याच्या मध्ये सर्व कर्माचरणाचा त्याग झालेला आहे, अशी जी आत्मज्ञान-निष्ठा ती अनुः सरणे. केवलात् एव ज्ञानात् मोक्षः, इति एषः अर्थनिश्चितः गीतासु सर्व-उपनिषत्सु च ।। (गीताभाष्य, ३।१) झणजे, ६ केवळ ज्ञाना पासून मोक्ष प्राप्त होतो, ही गोष्ट गीते मध्यें व सर्व उपनिषदां मध्ये निश्चयपूर्वक सांगितलेली ( १ ) हे ज्ञान ह्मणजे काय ? या प्रश्ना संबंधाने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांचे मतैक्य आहे किंवा नाही, या विषयी विचार पुढे केला जाईल.