पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ वैदिक तत्त्वमीमासा कतेचे फळ नव्हे. कारण जर ते धर्माचरणाचे फळ असते, तर त्याच्या संबंधाने सुखदु:ख स्पर्शाचा निषेध करणे बरोबर झालें नसतं. असे देखील ह्मणतां येणार नाहीं कीं, अंशरीरत्व प्राप्त होणे हे धर्माचरणाचेच फळ. कारण अशरीरत्व में स्वाभाविक असल्या मुळे, ते धर्माचरणाने उत्पन्न होते असे ह्मणणे बरोबर नाही. या वरून असे सिद्ध झालें कीं, मोक्ष नामक जें अशरीरत्व ते नित्य असून, धर्माचरणों पासून उत्पन्न होणारे जे फळ त्याच्याहून स्वभावतः अत्यंत भिन्न आहे.' हीच गोष्ट,-ह्मणजे कर्माचरणाचें फळ अशाश्वत असल्या मुळे, मोक्ष नामक जे शाश्वत टिकणारं असे मनुष्याचे अंतिम लक्ष्य ते केवळ कर्माचरणाने साध्य नाहीं, ही गोष्ट,-रामानुजाचार्यांनी देखील पुढील सारख्या अनेक वाक्यांत स्पष्टपणे प्रतिपादन केला आहेः-मीमांसा-पूर्वभाग-ज्ञातस्य कर्मणः अल्प-अस्थिर-फलत्वात् ००० ॥ (श्री- भाष्य, १।१।१ ) ह्मगजे, * कर्मकांडा मध्ये जो धर्मोपदेश केलेला आहे, त्याला अनुसरून आचरण केल्या मुळे जे फळ प्राप्त होते ते अल्प व अशाश्वत असते. वेदान्तवाक्यानि केवल-कर्म-फलस्य क्षयित्वं'•••दर्शयन्ति- तत् यथा इह कर्मचितः लोकः क्षीयते, एवं एब अमुत्र पुण्यचितः लोकः क्षीयते '••••* न हि अनुवैः प्राप्यते धुत्रं कर्मभिः '••••इत्यादीनि ॥ ( श्रीभाष्य, १।१।१ ) ह्मणजे, ६६ ज्या प्रमाणे इहलोकी कर्मचरणाने जे कांहीं फळ प्राप्त झालें तें नष्ट होते, त्या प्रमाणेच परलोकीं देखील कर्माचरणाच्या योगाने जे कांहीं फळ प्राप्त होते त्याचा