पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ वैदिक तत्त्वमीमांसा

  • एवं ००"धर्म-अधर्म-तारतम्य-निमित्तं शरीर-उपादानपूर्वकं सुख-दुःख–तारतम्यं अनियं संसाररूपं श्रुति-स्मृतिन्याय–प्रसिद्धम् । तथा च श्रुतिः- * न ह वै सशरीरस्य सतः प्रिय–अप्रिययोः अपहतिः अस्ति ' इति यथावर्णित संसाररूपं अनुवदति । 'अशरीर वाव सन्तं न प्रिय–अप्रिये स्पृशतः' इति प्रिय–अप्रिय-स्पर्शन–प्रतिषेधात् चोदनालक्षण-धर्म-कार्यत्वं मोक्षाख्यस्य अशरीरत्वस्य प्रतिषिध्यते इति गम्यते । धर्म-कार्यत्वे हि प्रिय–अप्रिय-स्पर्शनप्रतिषेधः न उपपद्यते । अशरीरत्वं एव धर्म-कार्य इति । चेत् । न । तस्य स्वाभाविकत्वात् ।'"""अतः एव अनुष्ठेयकर्म-फल-विलक्षणं मोक्षाख्यं अशरीरत्वं नियं इति सिद्धम् ॥ ( शारीरकभाष्य, १।१।४ ) * ह्मणजे, ‘श्रुति-स्मृति ग्रंथां मध्ये उपदिष्ट जें शारीरक, घाचिक, आणि मानसिक कर्म,-किंवा, लौकिक भाषेनें, क्रिया, वाणी, व विचार,-याला धर्म असें ह्मणतात; व या धर्म संबंधाने विवेचन करण्याविषयीं ' अथ अतः धर्मजिज्ञासा' या सूत्रा मध्ये प्रतिज्ञा केलेली आहे. तसेच, हिंसादि-क्रियारूप जो अधर्म तो निषिद्ध असल्या मुळे, ती आपल्या कडून आचरिला जाऊ नये ह्मणून, त्या विषय देखील ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. या प्रमाणे, धर्मग्रंथां मध्ये विहित ध निषिद्ध असे इष्ट व अनिष्ट जै धर्म व अधर्म त्यांची फळे लटलीं ह्मणजे, शरीर वाचा व मन यांच्या योगाने मात्र ज्यांचा अनुभव घेतां येतो, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला असतां जीं उत्पन्न होतात, आणि ब्रह्मा पासून जड़ प्राण्यां पर्यंत सर्व