Jump to content

पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना . . प्राच्य व पाश्चात्य अर्वाचीन पंडितांनी वेदांत तस्वमीमांसेचे शंकराचार्यांनी प्रतिपादित जें अद्वैत मत त्याची अग्राह्यता इतक्या निश्चितपणे व इतक्या जोराने प्रतिपादिली आहे की, या निबंधकारा सारख्या मनुष्याने त्या अद्वैत मताचे समर्थन किंवा मंडन करण्याला पुढे होणे म्हणजे केवळ त्याने आपल्या मूढतेचे व अंध अभिमानाचे प्रदर्शन करणे होय, आणि त्या मताचे मंडन करणे हा या निबंधाचा हेतुही नाही. हा निबंध तयार करण्याचा हेतु एवढाच आहे की, ज्यांना शंकराचार्यांचे मत अत्यंत अग्राह्य वाटते तेच ज्या अर्थी रामानुजाचार्यांच्या मताची स्तुति करितात, त्या अर्थी ( १) शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मध्ये कोणत्या गोष्टीं संबंधाने मतैक्य आहे, (२) त्यांच्या मध्ये तत्त्वमीमांसाविषयक कोणत्या गोष्टी संबंधानें मतभेद आहे, आणि ( ३ ) ज्या गोष्टीं संबंधाने त्यांच्या मध्ये मतैक्य आहे, त्या गोष्टी ज्यांना पूर्णपणे मान्य असतील त्यांचे मत, शंकराचार्य व रामनुजाचार्य यांच्या मध्ये ज्या तत्वमीमांसाविषयक गोष्टीं संबंधानें मतभेद आहे, त्या गोष्टी विषयी कोणाला अधिक अनुकूळ असले पाहिजे, शंकराचार्यांना किंवा रामानुजाचायना,-या तीन प्रश्नां संबंधाने विवेचन करण्याचा प्रयत्न करावयाचा. या तीन प्रश्नां पैकी पहिल्या प्रश्नाचे अंशतः या भागांत विवेचन केलेले आहे. ते विवेचन सर्वथैव यथार्थ असेलच असे नाहीं. मात्र त्या विवेचना संबंधाने मुख्य प्रश्न हा नव्हे की,