पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ वैदिक तत्त्वमीमांसा यौना ती भिन्न असे वाटले, परंतु काही अंशी जरी हे खरें आहे, तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की, शंकराचार्यांचीं मते व रामानुजाचार्यांची मते हीं सर्वथैव एकरूप नाहींत. त्यांच्या कांहीं मतांमध्ये कमी अधिक महत्वाचा थोडा बहुत भेद आहे. तथापि त्यांच्या मतांमध्ये जे भेद आहे, त्या भेदाचे विवेचन करणे हा प्रस्तुत लेखाचा उद्देश नव्हे, तर शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्या मध्ये जें कांही गोष्टींसंबंधाने मतैक्य आहे, त्या मतैक्याचे या निबंधाच्या प्रस्तुत भागांत विवेचन करावयाचे आहे.