पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ३१ हा मिथ्याज्ञानरूप अध्यास, त्याचा नाश करून आत्म्याचें एकत्व प्रतिपादन करणारी जी विद्या ती प्राप्त व्हावी एतदर्थ सर्व वेदांतांचा आरंभ झालेला आहे.' | शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रांवरील शारीरक भाष्यांतील या उतान्यांवरून असे स्पष्ट होतें कीं, रामानुजाचार्यांनी एका पूर्वपक्षाच्या मतांचा जो संक्षेप दिला आहे, त्यांतील सिद्धांतांचे वरील उतान्यांतील शंकराचार्यांनी प्रतिपादित सिद्धांतांशीं बाह्यतः तरी साम्य आहे. परंतु जरी हे साम्य वस्तुतः नसले,-ह्मणजे रामानुजाचार्यांनीं शंकराचार्यांच्या मतांचा जो अर्थ समजून त्यांच्या विरुद्ध वर निर्दिष्ट केलेला उल्लेख केला आहे, तो अर्थ जरी यथार्थ नसला, तरी ही गोष्ट निर्विवाद आहे कीं, शंकराचार्यांची मते व आपली मते यांच्या मध्ये अत्यंत महत्वाचा भेद आहे, असे रामानुजाचार्यांना वाटत असे. आतां पुष्कळ वेळां असें होतें कीं, दुसन्याची मते आपल्या मतांहून वस्तुतः भिन्न नसून देखील ती मते आपणांला यथार्थ रीतीनें न समजल्यामुळे, आपली मते त्या मतांच्या विरुद्ध आहेत असे आपणांला वाटत असते. या साधारण अनुभवाप्रमाणे असे असण्याचा संभव आहे कीं, शंकराचार्यांची मते व रामानुजाचार्यांची मते वस्तुतः भिन्न नसून देखील गैर समजामुळे रामानुजाचा