पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० वैदिक तत्त्वमीमांसा जीवत्व व संसारित्व देखील राहील. परंतु हा जो आत्म्याची उपाधींशी संबंध होतो, तो मिथ्याज्ञानामुळे होतो. परंतु ज्या अर्थी यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मिथ्याज्ञान नष्ट होणे शक्य नाही, त्या अर्थी जपर्यंत ब्रह्मात्मत्व उपलब्ध झालें। नाहीं तो पर्यंत आत्म्याचा उपाधींशी झालेल्या संबंधाची निवृत्ति होणे शक्य नाहीं, अतः च स्वाभाविकत्वात् अभेदस्य अविद्याकृतत्वात् च भेदस्य, विद्यया अविद्यां विधूय जीव; परेण अनन्तेन प्राज्ञेन आत्मना एकतां गच्छति ॥ ३॥२॥२६॥ ह्मणजे, ६ याप्रमाणे स्वभावतः अभिन्नत्व असून भेदत्व अविद्येमुळे प्राप्त झालेले असल्यामुळे, विद्या प्राप्त होऊन अविद्या नष्ट झाली, झणजे अनंत ज्ञानमय असा जो परमात्मा त्याच्याशीं आत्म्याचे एकरूप होते.' एवं अयं अनादिः अनन्तः नैसर्गिकः अध्यासः मिथ्याप्रत्ययरूपः । कर्तृत्व-भक्तृत्व-प्रवर्तकः सर्वलोकप्रत्यक्षः । अस्य अनर्थहेतोः प्रहाणाय आत्म-एकत्व-विद्या–प्रतिपत्तये सर्वे वेदान्ताः आरभ्यन्ते ॥ १।१ । १. ह्मणजे, ' उपाधींच्या धर्माचा आत्म्यावर केला जाणारा, कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादि संसारित्व उत्पन्न करणारा, मिथ्याज्ञानरूप, असा जो हा अनादि अनंत नैसर्गिक अध्यास त्याचा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आहे. व संसाररूप सर्व अनर्थाचें मूळ असा जो