पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ शंकराचार्य आणि रामानुजाचार्य जें नामरूपस्वरूप बीज त्या बीजाच्या आविष्करणावर अवलंबून राहतात. परें एवं ब्रह्म अविकृतं उपाधिसंपर्कात् जीवभावेन अवतिष्ठते ।।२।३।१८. म्हणजे, “निर्गुण निर्विकार असे जें परब्रह्म त्याचा उपाधींशीं संयोग झाला असतां तेच जीवरूपाने व्यक्त होते. बुद्धि-उपाधि-धर्म-अ- ध्यास–निमित्तं हि कर्तृत्व-भोक्तृत्वादि-लक्षणं संसारित्वं अकर्तुः अभोक्तुः च असंसारिणः नित्यमुक्तस्य सतः आत्मनः ।। २।३।२९. #णजे, “ आत्म्याचा बुद्धिरूप उपाधीश संयोग झाला ह्मणजे नित्यमुक्त, आणि ह्मणून कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादि संसारित्वापासून स्वभावतःच मुक्त, असा जो आत्मा तो उपाधींच्या धर्माचा स्वतःवर अभ्यास करून आपण कत भोक्ता असे समजू लागतो' उपाधीनां च अविद्याप्रत्युपस्थापितत्वात् ॥३।२।१९. म्हणजे, ज्या उपाधींच्या योगाने आत्म्याला संसारित्व प्राप्त होते, त्या उपाधि ह्मणजे आत्म्याहून भिन्न अशी परमार्थतः सत्य वस्तु नव्हे; तर उपाधि देखील अविद्येचेच कार्य होय.' यावत् एव च अयं बुद्धि–उपाधि-संबंधः तावत् जीवस्य जीवत्वं संसारित्वं च । ....अपि च मिथ्याज्ञानपुरःसरः अयं आत्मनः बुद्धि-उपाधिसंबंधः। न च मिथ्याज्ञानस्यं सम्यक् ज्ञानात् अन्यत्र निवृत्तिः अस्ति । इत्यतः यावत् ब्रह्मात्मता-अनवबोधः तावत् अर्य बुद्धि-उपाधि-संबंधः न शाम्यति ।। २।३।३०. झणजे, * जोपर्यंत आत्म्याचा उपाधींशी संबंध राहील तोपर्यंत त्याचे