पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ । | वैदिक तत्त्वमीमांसा जर यांपैकी एकच वर्णन यथार्थ मानावयाचे तर ते कोणते ? यांपैकी पहिल्या प्रश्नाला उत्तर असे की, ही दोन वर्णने परस्परविरुद्ध असल्यामुळे ती दोन्ही ब्रह्मस्वरूपाची यथार्थ वर्णने असणे शक्यच नाहीं. अर्थात्, त्यां पैकी कोणते तरी एक ब्रह्मस्वरूपाचे यथार्थ वर्णन असले पाहिजे. आतां, या दोहोंपैकी कोणते वर्णन यथार्थ समजावयाचें ? या प्रश्नाला उत्तर असे की, निर्गुणत्व वर्णन करणारी जी श्रुतीतील वचने तीच ब्रम्हाचे पारमार्थिक स्वरूप वर्णन करितात'. आह च श्रुतिः चैतन्यमात्रं विलक्षणरूपांतररहितं निर्विशेषं ब्रह्म....इति ॥ ३॥ २॥ १६. ह्मणजे, ज्याच्या मध्ये चैतन्याहून कोणतेही भिन्न रूप नाहीं, व कोणताही विशेष नाही, असे केवळ चैतन्यरूप 'ब्रह्म श्रुतिग्रंथांत वर्णिलेलें आहे.' कूटस्थब्रह्मात्मवादिनः एकत्व-ऐकांत्यात् ईशित-ईशितव्य-अभावे ईश्वर-कारण-प्रतिज्ञा–विरोधः इति चेत् । न । अविद्यात्मक-नामरूपबीज-व्याकरण--अपेक्षत्वात् सर्वज्ञत्वस्य ॥ २॥ १।१४. ह्मणजे, ' ब्रह्माचे निर्गुणत्व प्रति पादन करणान्या पक्षाच्या मते ब्रह्माशिवाय दुसरें कांहींच विद्यमान नसून ब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारचा विशेष नसल्यामुळे, ईश्वर आणि प्रजा असा भेदच विद्यमान नाहीं. ह्मणून हे मत ईश्वराच्या जगविषयक कारणत्वाच्या विरुद्ध नव्हे काय ? या प्रश्नाला उत्तर असे की, ईश्वराचे सर्वज्ञत्व, सर्वकारणव इत्यादि जे धर्म ते अविद्येपासून उत्पन्न होणारे